शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

कोरोना : 65 टक्के बेड रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 00:20 IST

आरोग्य यंत्रणेच्या निकषानुसार कोरोना संक्रमितांवर उपचारासाठी तीन प्रकारच्या रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात डेडिकेडट कोविड हॉस्पिटल, डेडिकेडट कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटर असा समावेश आहे. खासगी आणि सरकारी दवाखान्यात ही सुविधा जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणात पुरविली जात आहे. खासगी, सरकारी दवाखान्यात आयसीयू, ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर आणि जनरल अशा चार प्रकारच्या बेडवर कोराेना रुग्णांना उपचार सुरू आहे.

ठळक मुद्देसरकारी, खासगी रुग्णालयांत ३०९१ पैकी १०८२ बेडवर रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातून सर्वाधिक कोरोना संक्रमितांची नोंद झाली असली तरी सरकारी आणि खासगी रुग्णालयांत कोरोना रुग्णांसाठी तब्बल ६५ टक्के बेड रिकामे असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. जिल्हावासीयांसाठी दिलासादायक अशी ही बाब आहे. आरोग्य यंत्रणेच्या निकषानुसार कोरोना संक्रमितांवर उपचारासाठी तीन प्रकारच्या रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात डेडिकेडट कोविड हॉस्पिटल, डेडिकेडट कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटर असा समावेश आहे. खासगी आणि सरकारी दवाखान्यात ही सुविधा जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणात पुरविली जात आहे. खासगी, सरकारी दवाखान्यात आयसीयू, ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर आणि जनरल अशा चार प्रकारच्या बेडवर कोराेना रुग्णांना उपचार सुरू आहे. त्याअनुषंगाने २६ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १,७४१ बेड असून, ९४८ बेड शिल्लक आहेत. ४ डेडिकेटेड कोविड आरोग्य केंद्रात १४५ बेड असून, ६३ बेड शिल्लक आहेत. तसेच १५ कोविड केअर सेंटरमध्ये १२०५ बेड असून, ९९८ बेड शिल्लक आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना आता बेड नाही म्हणून उपचार मिळत नाही, ही ओरड होणार नाही, असे शिल्लक बेड संख्येवरून स्पष्ट होत आहे.जिल्ह्यातील १५ कोविड केअर केंद्रांत बेडसंख्या १,२०५ आहे. त्यापैकी ९९८ बेड शिल्लक आहेत. चार डेडिकेटेड कोविड आरोग्य केंद्रात १४५ पैकी ८२ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. २६ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १,७४१ बेड आहे. आयसीयूचे ४९१ पैकी २२१ बेड रिकामे आहेत. ऑक्सिजन युनिटचे ७१७ पैकी ३८५ बेड शिल्लक आहे. व्हेंटिलेटरचे १७८ पैकी १३७ बेड रिकामे आहेत.

२६ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची बेड क्षमताअचलपूर ट्रामा ५०. अंबादेवी हॉस्पिटल ६५. ॲक्झॉन १५०. बख्तार २८. बेस्ट ५०. भामकर अचलपूर ४१. सिटी हॉस्पिटल ४५. दयासागर ६०. दुर्वांकुर २०. एकता दर्यापूर ६०. गेटलाईफ ६०. गाेडे ६०. हिलटॉप ६०. किटुकले २१. महावीर ४०. आर्चिड ३०. पीडीएमसी १०५. रिम्स ९८. श्रीपाद कोविड ५६. श्री साई १९. सनराईज ३५. सुपर स्पेशालिटी ४५०. वरूड हॉस्पिटल २५. यादगिरे हॉस्पिटल १७. झेनिथ १०५.

१५ कोविड केअर आरोग्य केंद्राची बेड संख्याअचलपूूर ६५. अंजनगाव सुर्जी (पांढरी) १५०. बुरघाट १००. चांदूर बाजार ४०. चांदूर रेल्वे १००. चिखलदरा ५०. दर्यापूर सामदा ५०. धामणगाव रेल्वे १६०. धारणी ६०. अमरावती होमगार्ड ६०. मोर्शी ६५. नांदगाव प्रियदर्शिनी ५०. विदर्भ महाविद्यालय १३०. वलगाव गाडगेबाबा ७५. वरूड बेनाेडा ६०.

गेल्या आठवड्यापासून कोरोना संक्रमितांची संख्या चिंताजनक नाही. रुग्णालयातही बेड शिल्लक आहेत. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटरमध्ये बेड मिळत नाही, अशी ओरड नाही.- श्यामसुंदर निकम जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

चार डेडिकेटेड कोविड केंद्रातील बेडची संख्यादर्यापूर एसडीएच २५. मोर्शी एसडीएच २०. तिवसा ट्रामा सेंटर ५०. नांदगाव खंडेश्वर ट्रामा केअर सेंटर ५०.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या