अमरावती : कोरोना संक्रमनात मृत्यूचे सत्र सुरुच आहे. बुधवारी पुन्हा २० संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या १,१७१ वर पोहोचली आहे याशिवाय १,१७१ संक्रमितांची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ७८,५४८ झालेली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा साखळी खंडीत व्हावी, १५ एप्रिलपासून कठोर संचारबंदी जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, कोरोनाचे संक्रमण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. बुधवारी ५,०५२ चाचण्यांची तपासणी करण्यात आली. यात १,०९२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने २१.६१ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झालेली आहे. चार दिवसांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले.
उपचारानंतर बरे वाटल्याने बुधवारी ८०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनामुक्त नागरिकांची संख्या ६६,५२७ वर पोहोचली आहे. ही ८४.७० टक्केवारी आहे. याशिवाय रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवर आल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १.४९ टक्के असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
बुधवारी १४ तासांतील मृत्यू
(कृपया चार ओळी जागा सोडावी)