पोलीस विभागाच्या संकेत स्थळावर नोंदणीची प्रकिया : प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम, १५ दिवसांत कार्यान्वित होणारअमरावती : दुचाकी चोरी गेल्यावर संबंधित व्यक्ती पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवितात. मात्र आता इंटरनेटच्या माध्यमातून दुचाकी चोरीची तक्रार घरबसल्या आॅनलाईन करता येणार आहे. तसे संकेतस्थळ पोलीस विभागाने कार्यान्वित केले असून प्रायोगिक तत्त्वावर १५ दिवस सराव केला जाणार आहे. शहरात दिवसेंदिवस चोरीच्या वाढत्या घटना बघता पोलीस चौकस झाले आहेत. त्यातच विविध गुन्ह्याच्या तपासकार्यात आधुनिक यंत्रणेचा उपयोग घेतल्या जात आहे. यापूर्वी पोलीस विभागाने व्हॉटसअपवरून संबधीत गुन्ह्याची माहिती देणारी यंत्रणा सज्ज केली होती. तसेच महिलांच्या मदतीसाठी व्हॉट्सअॅपवरून तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. आता दुचाकी चोरीची तक्रार आॅनलाईन करणारी यंत्रणा पोलीस विभागाने कार्यान्वितकेली आहे. पोलिसांनी दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन सर्वप्रथम तक्रारकर्त्यांना नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर संकेत स्थळावरील पर्याय निवडून तक्रारकर्ता व त्यांच्या वाहनांची इत्यंभूत माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर तक्रार नोंदविली गेल्याचा संदेश संबंधित तक्रारकर्त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. दुचाकीच्या चोरीच्या घटनांवर अंकुश बसविण्याच्या उद्देशाने पोलीस विभागातर्फे हा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पोलीस विभागातर्फे महाराष्ट्रभरात ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. कोणच्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची दुचाकी जप्त केल्यास ती माहिती तक्रारकर्त्यांना तत्काळ मोबाईल संदेशद्वारे मिळणार आहे. अनेकदा पोलिसांना बेवारस पडलेल्या वाहने आढळून येतात. या वाहनांची माहितीसुध्दा संबंधित तक्रारकर्त्यांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)अशी करा दुचाकी चोरीची तक्रार पोलीस विभागाच्या ६६६.६ीुॅ१ंस्रँ्र७.्रल्ल/ीस्रङ्म’्रू२३ं३्रङ्मल्ल या वेबसाईटवर गेल्यानंतर पब्लिक व ई-तक्रार असे दोन पर्याय दिसेल. त्यापैकी पब्लिक या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर पुढील दिलेल्या निर्देशानुसार संबंधित तक्रारकर्त्याला मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, ई-मेल पत्ता व पासवर्ड टाकावा लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित तक्रारकर्त्यांची नोंदणी होणार आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याला लॉग इन करून स्क्रिनवर दिलेला अर्ज भरावा लागणार आहे. त्या अर्जात तक्रारकर्त्याला स्वत:बद्दलची व चोरी गेलेल्या वाहनांची इत्यंभूत माहिती भरावी लागणार आहे. सर्व माहिती भरल्यानंंतर त्या तक्रारीची नोंद गुन्हे शाखेकडे होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर तक्रार दाखल झाल्याचा संदेश मिळणार आहे. २४ तासांत पोलीस करणार कारवाईचोरीची तक्रार झाल्यानंतर गुन्हे शाखेकडून ती तक्रार संबंधित पोलीस ठाण्याकडे पाठविली जाणार आहे. त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना २४ तासाच्या आत त्यावर कारवाई करणे अनिवार्य राहणार आहे. संबंधित ठाण्याला तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांची प्रत काढून त्यावर तक्रारकर्त्याची स्वाक्षरी घ्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया २४ तासांच्या आत न झाल्यास त्याबाबतच्या माहितीचा संदेश सहायक पोलीस आयुक्तांना मिळणार आहे. त्यांनीही ४८ तासांच्या आत कारवाई केली नाही तर तो संदेश पोलीस उपायुक्तांना मिळणार आहे आणि त्यानंतरही कारवाईची प्रक्रिया न झाल्यास तो संदेश पोलीस आयुक्तांना मिळणार आहे. विजय खत्री पहिले तक्रारकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी विजय पुरणलाल खत्री यांची दुचाकी आठ महिन्यांपूर्वी राजापेठ परिसरातून चोरी गेली होती. त्यांनी त्यावेळी राजापेठ ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. मात्र, अद्यापपर्यंत त्यांच्या दुचाकीचा शोध लागला नव्हता. मात्र, काही दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेने प्रतीक शिंदे या दुचाकीचोराला अटक करून त्याच्याजवळून १४ दुचाकी जप्त केल्यात. त्यामध्ये विजय खत्री यांचीही दुचाकी आहे. त्यामुळे विजय खत्री यांनी सोमवारी गुन्हे शाखेकडे आॅनलाईन तक्रार नोंदवून पहिले तक्रारकर्ता ठरले.चोरीच्या घटनांवर अंकुश बसविण्यासाठी तसेच नागरिकांना तक्रार करण्यास सोयीचे जावे या उद्देशाने आता आॅनलाईन तक्रार करता येणार आहे. पोलीस विभागाने दिलेल्या वेबसाईटवर नोंदणी करून दुचाकी चोरीची तक्रार घरबसल्या करता येणार आहे. - दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा.
दापोली अर्बन बँकेवर पुन्हा सहकार पॅनेल
By admin | Updated: April 26, 2016 00:12 IST