शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आता महाविद्यालय स्तरावर होणार दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 22:41 IST

विद्यापीठ स्तरावर होणारा दीक्षांत समारंभ आता महाविद्यालय स्तरावर घेण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे.

ठळक मुद्देअमरावती विद्यापीठाचा निर्णय : येत्या शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणी

आॅनलाईन लोकमतअमरावती : विद्यापीठ स्तरावर होणारा दीक्षांत समारंभ आता महाविद्यालय स्तरावर घेण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून होईल, अशी माहिती आहे.विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात आचार्य पदवी, गुणवत्ता यादीत स्थान पटकवणारे तसेच पारितोषिक विजेते अशा मोजक्याच विद्यार्थ्यांचा गौरव होतो. उर्वरित पदवीधरांना जागेवर उभे राहून पदवी मिळाल्याची घोषणा केली जाते. त्यानंतर एका रांगेत लिपिक दर्जाच्या कर्मचाºयांकडून पदवी दिली जाते. यामुळे प्रत्येक पदवीधराचा सन्मान व्हावा, यासाठी महाविद्यालय स्तरावर पदविदान समारंभाचे आयोजन करण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे. त्यामुळे समारंभात येणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा प्रवास खर्च, गैरसोय तसेच पदवीसाठी लागणारा खर्च थांबेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयास २१ आॅगस्ट २०१५ रोजी तत्त्वत: मान्यता प्रदान करण्यात आली आहे.दरम्यान, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदवी समारंभ यंदा २३ फेब्रुवारी रोजी होत आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना विद्यापीठात पदवी प्रदान केली जाणार आहे. विद्यापीठ स्तरावर दरवर्षी होणाºया दीक्षांत समारंभात २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च येतो. दीक्षांत समारंभासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक जयंत वडते आदी चमू जोमाने कार्यरत आहे.समारंभाचा खर्च विद्यापीठ देणारयेत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयस्तरावर होणाºया पदविदान समारंभाचा खर्च विद्यापीठाकडून विद्यार्थीनिहाय मिळेल. समारंभाचे स्वरूप, आयोजन, पाहुणे आदी बाबी प्राचार्यांना ठरवाव्या लागतील.लीड कॉलेजवर जबाबदारीची शक्यतामहाविद्यालय स्तरावर दीक्षांत समारंभ घेण्याबाबत एकमत झाले आहे. मात्र, जिल्ह्याच्या ठिकाणी लीड कॉलेजमध्ये समारंभाच्या आयोजनबाबतही मंथन सुरू आहे.महाविद्यालय स्तरावर पदविदान समारंभ आयोजनाबाबत नियमावली तयार करण्याची प्रक्रिया युद्धस्तरावर सुरू आहे. ८ ते १० दिवसांत नियमावली तयार होताच, त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. विद्यार्थ्यांचा अभिमान जोपासण्यासाठी हे पाऊल उचलले.- राजेश जयपूरकर,प्र-कुलगुरू, संत गाडगेबाबा विद्यापीठ