शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना चालान भरण्यासाठी एकाच बँकेत सुविधा

By admin | Updated: July 1, 2014 23:12 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध परीक्षेसंदर्भात आवेदनपत्र शुल्क भरण्याची सुविधा भारतीय स्टेट बँक या एकमेव बँकेत केली आहे. यामुळे एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी होऊन तारांबळ उडत आहे.

विद्यापीठाविरुध्द संताप : परीक्षा आवेदनपत्र शुल्क भरण्यासाठी रांगाअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध परीक्षेसंदर्भात आवेदनपत्र शुल्क भरण्याची सुविधा भारतीय स्टेट बँक या एकमेव बँकेत केली आहे. यामुळे एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी होऊन तारांबळ उडत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून विद्यापीठ प्रशासनाविरुध्द संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे सादर करण्याकरिता सुलभ व्हावे म्हणू महाविद्यालयामार्फत परीक्षा आवेदनपत्र भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. विद्यापीठात येणारा विद्यार्थी अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशीम या जिल्हातील असून बहुतांश अनुतीर्ण (माजी) विद्यार्थी परीक्षा आवेदनपत्रे महाविद्यालयात न पाठविता ते थेट विद्यापीठात येऊन शुल्क भरतात. त्यामुळे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या रागां लागतात. या विद्यार्थ्यांच्या सोईकरिता स्टेट बॅकेत चालान भरण्याची सुविधा विद्यापीठाने केली आहे. याकरिता बँक विद्यार्थ्यांकडून ३० रुपये सेवा शुल्क आकारते. शुल्काची चालान आवेदनपत्रासह पोस्टाद्वारे व थेट विद्यापीठात दाखल करु शकतात. मात्र जिल्हात स्टेट बँकेच्या शाखा मोजक्याच तर विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बँकेच्या विविध शाखांमध्ये चालान काढण्याकरिता विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासन्तास बँकेत रांगा लावून उभे राहावे लागत आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठाने आणखी काही बँकांमध्ये चालानची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.