शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर नगर परिषद अभियंत्याची वादग्रस्त व्हॉट्‌सॲप पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:12 IST

नगराध्यक्षांसह नगरसेवक संतापलेत, वातावरण तापले परतवाडा : अचलपूर नगर परिषदेचे अभियंता दुधानी यांनी व्हॉटस्‌ ॲपवर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टने नगराध्यक्षांसह ...

नगराध्यक्षांसह नगरसेवक संतापलेत, वातावरण तापले

परतवाडा : अचलपूर नगर परिषदेचे अभियंता दुधानी यांनी व्हॉटस्‌ ॲपवर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टने नगराध्यक्षांसह नगरसेवक संतापले आहेत. या वादग्रस्त पोस्टमुळे नगर परिषदेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नागरिकांमध्येही याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्याबाबतची तक्रार नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे या वादग्रस्त व्हॉट्‌सॲप पोस्टच्या अनुषंगाने केली आहे. या पोस्टमध्ये नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना अभियंत्याने ‘कौआ’ संबोधले आहे. ही बाब पदाधिकाऱ्यांचा अपमान असल्याच्या प्रतिक्रिया यामुळे उमटत आहेत. मुख्यमंत्र्यांबाबतही यापूर्वी याच अभियंत्याने आक्षेपार्ह छायाचित्रे व्हाॅट्‌सॲप ग्रुपवर व्हायरल केली. या अनुषंगाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांसह आपणाकडे निवेदन दिले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तक्रार दिल्यानंतर पुढे जिल्हाधिकारी व पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. मात्र, वृत्त लिहिस्तोवर परतवाडा पोलीस स्टेशन व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली गेली नाही.

कोट

नगर परिषदेच्या अभियंत्याकडून व्हॉटस्‌ॲपवर टाकण्यात आलेली पोस्ट आक्षेपार्ह आहे. नगरसेवकांसह मुख्याधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार देण्यात आली आहे.

- सुनिता फिसके, नगराध्यक्ष, अचलपूर.