शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
3
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
4
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
5
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
6
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
7
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
8
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
9
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
12
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
13
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
14
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
15
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
16
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
17
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
18
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
19
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
20
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?

मोबाईलद्वारे मोटरसायकल, वीज बिघाड अन् उपकरणांवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:23 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बुधवारी आविष्कार स्पर्धेला थाटात प्रारंभ झाला. यात पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आपली कल्पनाशक्ती आणि ज्ञानाच्या बळावर नवसंशोधनात आघाडी घेतली आहे. मोटरसायकलची चोरी रोखणे, वीज वितरण व्यवस्थेत बिघाड शोधणे, घरातील विद्युत उपकरणे गुगलवरून नियंत्रण अशा एक ना अनेक प्रतिभा मॉडेल आणि पेपर स्वरुपात मांडल्या आहेत.

ठळक मुद्देविद्यापीठात नवसंशोधकांची यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बुधवारी आविष्कार स्पर्धेला थाटात प्रारंभ झाला. यात पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आपली कल्पनाशक्ती आणि ज्ञानाच्या बळावर नवसंशोधनात आघाडी घेतली आहे. मोटरसायकलची चोरी रोखणे, वीज वितरण व्यवस्थेत बिघाड शोधणे, घरातील विद्युत उपकरणे गुगलवरून नियंत्रण अशा एक ना अनेक प्रतिभा मॉडेल आणि पेपर स्वरुपात मांडल्या आहेत.विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण भवन सभागृहात आविष्कार स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली तर, प्रमुख अतिथी म्हणून दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य जी. गोपाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, आय.आय.एल.चे संचालक डी.टी. इंगोले, रसायनशास्त्र विभागप्रमुख आनंद अस्वार, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख आदी उपस्थित होते. आविष्कार स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आटोपल्यानंतर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेले मॉडेल, पेपरची पाहणी केली. कुलगुरू चांदेकर, अनुदान आयोगाचे सदस्य जी. गोपाल यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले. काही मॉडेल्सचे निरीक्षण करताना ते समाजपयोगी कसे ठरतील, याची माहितीदेखील कुलगुरूंनी घेतली. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती व प्रतिभा बघण्यासाठी आविष्कार स्पर्धेला जणू यात्रेचे स्वरूप आले होते.हे मॉडेल ठरले लक्षवेधकआविष्कार स्पर्धेत शिवकालीन जलव्यवस्थापन, रात्रीचे अपघात टाळण्यासाठी प्राण्यांच्या शिंगांना रेडीयम, टाकाऊ कागदाचा वापर करून पर्यावरणपूरक मूर्त्यांची निर्मिती, पर्यावरणासाठी पोषक अ‍ॅक्वॉपाईड, इंधनाशिवाय चालणारे वाहन, सोलर वॉटर हिटर, पॅराबोलिक सोलर कुकर, गुगल असिस्टंटवर घरगुती विद्युत वापराच्या यंत्रावर नियंत्रण, मॅप सिस्टिम, वीज वितरण प्रणालीत बिघाड आल्यास मोबाईलवर तत्काळ माहिती, ड्रोनद्वारे शेतात फवारणी, ड्रोनद्वारे मिल्ट्री आॅपरेटिंग ईन कोल माईन्स, ग्रामीण रूग्णालयांची मोबाईलवर कनेक्टिव्हीटी, अ‍ॅड्रॉईड मोबाईलने मोटरसायकल चोरी रोखणे आदी मॉडेल्स लक्षवेधक ठरलीत.पेपर सादरीकरणातून सामाजिक बोधविद्यापीठाच्या भौतिकशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विद्यार्थी विवेक मेश्राम यांनी ‘शाळाबाह्य मुले’ या विषयाचा पेपर सादर केला आहे. राज्यात चार लाख मुले ही शाळाबाह्य असून, त्यांना तत्काळ शिक्षणांच्या प्रवाहात आणले नाही तर ही मुले भविष्यात वेगळ्या वळणावर जातील, अशी भीती व्यक्त करण्यात आली. ही मुले उद्याच्या देश निर्मितीचे शिलेदार असणार आहेत. गैरमार्गाने या मुलांचा प्रवास सुरू होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपाययोजनांसंदर्भात मेल पाठविल्याची माहिती विवेक मेश्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.