शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीच्या जाचक अटींविरोधात कंत्राटदारांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:03 IST

१ जुलैपासून देशभरात लागू करण्यात आलेल्या वस्तू व सेवाकरातील जाचक अटींमुळे बांधकाम व्यावसायिकांवर अवकळा आली आहे.

ठळक मुद्देविदर्भस्तरीय धरणे : मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १ जुलैपासून देशभरात लागू करण्यात आलेल्या वस्तू व सेवाकरातील जाचक अटींमुळे बांधकाम व्यावसायिकांवर अवकळा आली आहे. कंत्राटदाराच्या अडचणीवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी विदर्भातील बांधकाम कंत्राटदारांनी केली आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर विदर्भातील बांधकाम कंत्राटदारांच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाºयांनी व कंत्राटदारांनी विदर्भस्तरीय धरणे दिली.अमरावती जिल्हा कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डहाके यांच्यासह या धरणे आंदोलनात अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया येथील कंत्राटदार संघटना व बिल्डर असोसिएशनचे सदस्य सहभागी झाले. स्थानिक कंत्राटदारांना रोजगार मिळेल अशी सर्वसमावेशक भूमिका राज्य शासनाने घ्यावी, कंत्राटदाराच्या नोंदणी संख्येनुसार कामाची निविदा काढण्यात यावी, प्रचलित पद्धतीनुसार दरपत्रक ठरविण्यात यावे, राजस्व शुल्काची दुबार वसुली बंद करण्यात यावी याशिवाय अनामत रक्कम भरण्यापासून सूट मिळण्याबाबतचे प्रमाणपत्र ही सुविधा पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी धरणे आंदोलनातून करण्यात आली. सध्या लागू करण्यात आलेली केंद्रीय दरपत्रक पद्धती अन्यायकारक असल्याचे मत नोंदविण्यात आले. शासनाची जी विकासाची कामे कंत्राटी पद्धतीने कंत्राटदाराकडून राबविण्यात येतात व जी अद्यापही पूर्ण झाली नाहीत, अशा कामांवर लागणारा जीएसटी शासनाने भरावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या धरणे आंदोलनाला आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार बच्चू कडू यांनीसुद्धा भेट दिली. यात १५०० पेक्षा अधिक कंत्राटदार सहभागी झाले.