शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी शहर अभियंत्यासाठी शासनादेशाची पायमल्ली !

By admin | Updated: March 20, 2017 00:10 IST

कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या सेवानिवृत्त व्यक्तीला ‘शहर अभियंता’ या पदाचे लाभ मिळवून देण्यासाठी शासनादेशाची राजरोसपणे पायमल्ली केली जात आहे.

अनधिकृत नियुक्तीला वरदहस्त : आयुक्तांचा लक्षवेधअमरावती : कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या सेवानिवृत्त व्यक्तीला ‘शहर अभियंता’ या पदाचे लाभ मिळवून देण्यासाठी शासनादेशाची राजरोसपणे पायमल्ली केली जात आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधक सुद्धा या प्रशासकीय अनधिकृतेवर ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. त्यामुळे सदारांना वरदहस्त तरी कुणाचा? असा लाखमोलाचा सवाल उपस्थित झाला आहे. नगरविकास विभागासह महापालिका यंत्रणेने सदारांची नियुक्ती आणि अनधिकृत मुदतवाढीबाबत मौन धारण केल्याने पाणी नेमके मुरतेय तरी कोठे? असा सवाल उठला आहे. विशेष म्हणजे यंत्रणा अडचणीत येवू नये, यासाठी सदार यांच्या नियुक्ती व अतिरिक्त कार्यभारासह त्यांच्या मुदतवाढीचा मुद्दा आमसभेत पाठविला जाणार आहे. तेथे सभागृहाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सदारांचे घोडे गंगेत न्हावून नेण्याचा जोरकस प्रयत्न केला जाणार आहे. शहर अभियंता पदावर शासनाने एका ज्येष्ठ अभियंत्याला पाठविले असताना त्यांची अन्य ठिकाणी बोळवण करत सदार विनामुदतवाढ आणि विनाआॅर्डर ‘शहर अभियंता’ या पदावर बसले आहेत. मागील काही महिन्यांपासून त्यांचे मानधन रखडले असताना त्यांना या कंत्राटी नियुक्तीसह अतिरिक्त कार्यभारात इतका ‘इंटरेस्ट’ का? अशी चर्चा आता पालिका वर्तुळात रंगू लागली आहे. महापालिकेचे संपूर्ण कामकाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि नगरविकास खात्याच्या चौकटीत चालत असताना शहर अभियंता म्हणून त्यांना प्रत्येक वेळी का मिरविले जाते? याचे उत्तर यंत्रणेजवळ नाही. राजापेठ ओव्हरब्रिज या विवक्षित कामासाठी त्यांची कंत्राटी नियुक्ती असताना सदार हे पूर्णवेळ शहर अभियंता आहेत की काय? अशा तोऱ्यात वागतात, त्यांचा अ‍ॅटीट्यूड पाहण्याजोगा असल्याची टिका आता होवू लागली आहे. सदारांच्या कंत्राटी नियुक्तीमुळे संजय पवार, संजय सोनवणे, गहेरवार यांच्यासह यंत्रणेने अनंत पोतदार यांच्यावर प्रशासकीय अन्याय केल्याचे आता राजरोसपणे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)सदारांना वित्तीय अधिकार बेकायदेशीरकरार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय व वित्तीय अधिकार प्रदान करता येणार नाहीत, असे सामान्य प्रशासन विभागाच्या डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयात नमूद असताना अमरावती महापालिकेने या शासनादेशाला ‘खो’ देवून महापालिका शासनाला जुमानत नसल्याचे दाखवून दिले आहे. सदार यांना अतिरिक्त शहर अभियंता पदाचा प्रभार देवून मनपाने या शासनादेशातील अटींना हरताळ फासला आहे. सदारांना प्रशासकीय व वित्तीय अधिकार देणे ही शासन निर्णयाची राजरोस पायमल्ली आहे. असा आहे शासन निर्णय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने करण्यात येणारी नियुक्ती ही नियमित स्वरूपाच्या कामकाजासाठी न करता विवक्षित कामासाठीच करण्यात यावी, नियमित मंजूरपदावर करार पद्धतीने नियुक्ती करता येणार नाही. अशी पदे सेवाप्रवेश नियमानुसार भरण्यात यावीत तथा करार पद्धतीच्या नियुक्तीमुळे शासनसेवेत असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या पदोन्नतीच्या संधीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे. सदारांच्या बाबतीत मात्र त्याला खो देण्यात आला आहे.