शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात नियमित स्प्रेईंग, फॉगिंग, सफाईकामांत सातत्य ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:14 IST

कामात कुचराई केल्यास कठोर कारवाई, पालकमंत्र्यांनी घेतला महापालिका, नगरपालिका कामकाजाचा आढावा अमरावती : जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामात सातत्य नसल्याने ...

कामात कुचराई केल्यास कठोर कारवाई, पालकमंत्र्यांनी घेतला महापालिका, नगरपालिका कामकाजाचा आढावा

अमरावती : जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामात सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आजार वाढत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी यापूर्वीच खबरदारी घेणे आवश्यक होते. सार्वजनिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीतून शहरातून नियमित स्प्रेईंग-फॉगिंग, सफाईकामात सातत्य ठेवावे. स्वच्छता व आरोग्य सुरक्षिततेच्या कामात कुचराई कराल, तर कठोर कारवाई करू, असा इशारा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे दिले.

पावसाळी साथरोग प्रतिबंधक उपाययोजना व सार्वजनिक स्वच्छतेबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, नगर परिषद प्रशासन अधिकारी गीता वंजारी, माजी महापौर विलास इंगोले, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत तसेच नगरपालिका, पंचायतींचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, पावसाळी साथरोग प्रतिबंध, डास निर्मूलन, सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने नालेसफाई, औषध फवारणी, सर्व ठिकाणी नियमित स्वच्छता आवश्यक आहे. पावसाळी आजार वाढत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या नित्याच्या कामांत अजिबात खंड पडता कामा नये. तिवसा, चिखलदरा, धारणी व इतर शहरांमध्येदेखील अस्वच्छतेमुळे आजार वाढत असल्याबाबत तक्रारी येत आहेत. स्वच्छतेची कामे शहरातील सर्वच परिसरात काटेकोरपणे राबवावीत. झोपडपट्टी वसाहतीत नियमित स्वच्छता होत नसल्याचीही तक्रार आहे. नागरिकांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे सफाईची कामे तात्काळ राबवावीत. यानंतर याबाबत एकही तक्रार येता कामा नये. तसे घडल्यास जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध कामांसाठी प्राप्त होणारा निधी अखर्चित राहता कामा नये. प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेच्या प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून घ्याव्यात. अनेकदा निधी येऊनही कामे सुरू होत नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. विकासकामांबाबत हयगय खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे तात्काळ कामांमध्ये गती व सुधारणी करावी. विविध कामांचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आपण स्वत: नगरपालिका, नगरपंचायतींच्या कामांची पाहणी करू, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.