शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरांमध्ये नियमित स्प्रेईंग, फॉगिंग, सफाईकामात सातत्य ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 05:01 IST

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी यापूर्वीच खबरदारी घेणे आवश्यक होते. सार्वजनिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीतून शहरातून नियमित स्प्रेईंग-फॉगिंग, सफाईकामात सातत्य ठेवावे. स्वच्छता व आरोग्य सुरक्षिततेच्या कामात कुचराई कराल, तर कठोर कारवाई करू, असा इशारा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री  यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे दिले.

ठळक मुद्देकामात कुचराई केल्यास कठोर कारवाई, पालकमंत्र्यांकडून आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामात सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आजार वाढत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी यापूर्वीच खबरदारी घेणे आवश्यक होते. सार्वजनिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीतून शहरातून नियमित स्प्रेईंग-फॉगिंग, सफाईकामात सातत्य ठेवावे. स्वच्छता व आरोग्य सुरक्षिततेच्या कामात कुचराई कराल, तर कठोर कारवाई करू, असा इशारा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री  यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे दिले. पावसाळी साथरोग प्रतिबंधक उपाययोजना व सार्वजनिक स्वच्छतेबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, नगर परिषद प्रशासन अधिकारी गीता वंजारी, माजी महापौर विलास इंगोले, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत तसेच नगरपालिका, पंचायतींचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.तिवसा, चिखलदरा, धारणी व इतर शहरांमध्येदेखील अस्वच्छतेमुळे आजार वाढत असल्याबाबत तक्रारी येत आहेत. शहरातील सर्वच परिसरात स्वच्छतेची कामे काटेकोर राबवावीत. झोपडपट्टी वसाहतीत नियमित स्वच्छता होत नसल्याचीही तक्रार आहे. नागरिकांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे सफाईची कामे तात्काळ राबवावीत. यानंतर याबाबत एकही तक्रार येता कामा नये. तसे घडल्यास जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध कामांसाठी प्राप्त होणारा निधी अखर्चित राहता कामा नये. प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेच्या प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून घ्याव्यात. अनेकदा निधी येऊनही कामे सुरू होत नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. विकासकामांबाबत हयगय खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे तात्काळ कामांमध्ये गती व सुधारणी करावी. विविध कामांचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आपण स्वत: नगरपालिका, नगरपंचायतींच्या कामांची पाहणी करू, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर