शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण लसीकरणासाठी मोहिमेत सातत्य राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 05:01 IST

कोविड साथीचे प्रमाण घटल्याने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ‘मिशन बीगिन अगेन’ अंतर्गत विविध बाजारपेठा, व्यवहार यांना परवानगी देण्यात आली. तथापि, या संसर्गामुळे निर्माण  झालेला धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे  अमरावतीकरांना गाफील राहून चालणार नाही. गतवेळच्या साथीने दिलेल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. भीती नको; पण दक्षता बाळगावी.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे आढळलेले रुग्ण, मंगळवारी जिल्ह्यात आढळलेले नवे नऊ कोरोनाबाधित लक्षात घेता सर्वत्र सतर्कता बाळगण्याची गरज आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी केले. प्रशासनाने मोहिमेद्वारे लसीकरणाला वेग दिला. तथापि, प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणासाठी मोहिमेत सातत्य राखण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.भीती नको; पण दक्षता बाळगाकोविड साथीचे प्रमाण घटल्याने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ‘मिशन बीगिन अगेन’ अंतर्गत विविध बाजारपेठा, व्यवहार यांना परवानगी देण्यात आली. तथापि, या संसर्गामुळे निर्माण  झालेला धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे  अमरावतीकरांना गाफील राहून चालणार नाही. गतवेळच्या साथीने दिलेल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. भीती नको; पण दक्षता बाळगावी. प्रत्येकाने मास्क, शारीरिक डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचे पालन करावे. असे आवाहन पालकमंत्री ठाकूर यांनी केले. 

लसीकरणापासून कुणीही वंचित राहू नये- जिल्ह्यात लसीकरण मोहिमेत साडेसहा लाख नागरिकांचे लसीकरण झाले. मोहिमेत लसीकरणाच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी लसीकरणाची दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण अद्याप ३५ टक्के एवढे आहे. हे कमी प्रमाण पाहता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण व्हावे. ज्या नागरिकांनी अद्यापही लस घेतली नाही किंवा दुसरी मात्रा घेतलेली नाही, त्यांनी तात्काळ आपले लसीकरण करून घ्यावे व स्वत:सह इतरांनाही सुरक्षित करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.         - कोरोनाकाळात विविध क्षेत्रांना अडचणींना सामोरे जावे लागले. शासन व प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साथ नियंत्रणात आली. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. आता पुन्हा साथ वाढता कामा नये.  कोविड अनुरूप जीवनशैलीचा अवलंब प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर