शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शासनादेशाचा हा तर अवमानच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 22:30 IST

मागील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने १० जानेवारी २०१७ ला घेतला होता.

ठळक मुद्दे‘डेडलाईन’ संपली : ३८ हजार शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने १० जानेवारी २०१७ ला घेतला होता. हे अनुदान २६ आॅक्टोबरला उपलब्ध करून कुठल्याही परिस्थितीत ३१ आॅक्टोबरपूर्वी शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले गेले. वाटपाची ‘डेडलाइन’ संपली असताना जिल्हास्तरावर निधीच उपलब्ध झालेला नाही. हा तर शासनादेशाचाच अवमान असल्याचा सूर उमटत आहे.गेल्या हंगामात बाजार समित्यांमध्ये ३८ हजार ७९१ शेतकºयांचे ६ लाख ८ हजार २८८ क्विंटल सोयाबीन हमीपेक्षा किती तरी कमी भावाने विकले गेले. यासाठी आवश्यक असणारे १२ कोटी १६ लाख ५७ हजार ५२० रुपयांचे प्रस्ताव पणन आयुक्तस्तरावर मंजूर आहेत. मात्र, वर्षभरापासून शासनाने अनुदान उपलब्ध केले नव्हते. आकस्मिक निधीतून अनुदान उपलब्ध करण्याचा शासनादेश सहकार व पणन विभागाने २६ आॅक्टोबरला काढला.१ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत बाजार समितीमध्ये विक्री करण्यात आलेल्या सोयाबीनला २५ क्विंटल मर्यादेत प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान शासन देणार आहे. यासाठी४५ हजार ४७ प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयांना सादर झाले होते. या प्रस्तावांची तालुका व जिल्हास्तरीय समितीने पडताळणी केलेली आहे. शासनादेश असताना निधीच उपलब्ध न केल्याने शेतकºयांची भलावण केल्याचा आरोप होत आहे.गतवर्षीच्या खरिपात सोयाबीनचे पेरणीक्षेत्र तीन लाख हेक्टर होते तसेच सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे उत्पादकता वाढली. मात्र, हंगामात बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली तसा व्यापाºयांनी भाव पाडला. अगदी दोन हजार रुपयांनी खरेदी केल्यामुळे उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. त्यामुळे शासनाने आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या सोयाबीनला अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, १० महिन्यानंतरही निधी उपलब्ध झालेला नाही.