शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावात दूषित पाणी पुरवठा

By admin | Updated: August 4, 2016 00:11 IST

अंजनगाव व दर्यापूर तालुक्यातील १५९/७९ गावांना अनेक दिवसांपासून अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून...

जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष : जलप्रकल्पावर सुरक्षेचा अभाव, जिजाऊ ब्रिगेडने दिले निवेदन अंजनगाव सुर्जी : अंजनगाव व दर्यापूर तालुक्यातील १५९/७९ गावांना अनेक दिवसांपासून अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून साथरोगांचा फैलाव वाढल्यामुळे त्यामुळे तालुक्यामधील ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यात आजारी रुग्णांची संख्या वाढली आहे. येथील जीवन प्राधिकरणाच्या जलप्रकल्पावरून दोन शहरांसह इतर गावांना पाणीपुरवठा होत असताना एका वृद्ध सुरक्षा रक्षकाशिवाय इतर कोणतीही सुरक्षा व्यवस्था येथे नाही. अंजनगाव व सुर्जी या दोन शहरामध्ये असलेल्या लाखो लीटर साठवणुकीच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ वराहांचा मुक्त संचार दिसून येतो. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी अखेर आक्रमक होवून आंदोलनाचा पवित्रा घेतला. आठ दिवसात गढूळ पाणीपुरवठा बंद न झाल्यास आंदोलनाचा त्यांनी इशारा जीवन प्राधिकरण कार्यालयाला दिला आहे. अंजनगाव सुर्जी व दर्यापूर या दोन शहरांसह १५६ व ७९ गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत पाणीपुरवठा होत असून अनेक दिवसापासून अतिशय गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. वैद्यकीय चाचणीनुसार हे पाणी पिण्यायोग्य नाही, तरी सुध्दा नाईलाजास्तव नागरिकांना हे अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार मजिप्रा कार्यालयात तक्रारी दाखल केल्या पण, अधिकाऱ्यांकडून कोणतीच दखल घेतली गेली नाही. तसेच शहरातील फुटलेल्या पाईपलाईनमध्ये घाण पाणी शिरून पाणी दूषित होत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दोन शहरांना पेयजल पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या मजिप्रा शाखा अभियंत्यांंची बदली झाल्यामुळे अंजनगाव व सुर्जी शहराची जबाबदारी आता कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे हे सुध्दा कळत नाही. इतकेच नव्हे तर तक्रार देण्यास गेलेल्या नागरिकांना मजिप्रा कार्यालयाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. अखेर जिजाऊ बिग्रेडने याप्रकरणाची दखल घेतली. या महिलांनी मजिप्राचे उपअभियंता (प्रभारी) डी.के.राऊत यांना आठ दिवसांत गढूळ पाणीपुरवठा सुरळीत करुन स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे निवेदन देण्यात आले. स्वच्छ पाणी न मिळाल्यास यानंतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सीमा कोल्हे, सारिका मानकर, राधा सावरकर, सीमा घोगरे, सविता बीजेवार, स्मिता लहाने, मीना कोल्हे, संगीता दाळू, वर्षा सावरकर, निलिमा कडू, अर्चना तुरखडे उपस्थित होत्या. दोन शहरांसह १५६/७९ गावातील नागरिकांच्या जीवाशी मजिप्राने चालविलेला खेळ तत्काळ थांबविण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडद्वारे करण्यात आली आहे. गढूळ व दूषित पाण्यामुळे परिसरात साथीचे आजार बळावले आहेत. यावर अंकुश लावण्याकरिता मजिप्राने सहकार्य करावे, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. उपसलेला गाळ पुन्हा धरणात पावसाळा लागण्यापूर्वी शहानूर धरणाचे खोलीकरण करण्यात आले. पण त्यातील उपसलेला गाळ धरणाच्या शेवटच्या टोकाजवळ व धरणाच्याच काठाजवळ नेऊन टाकल्यामुळे तो गाळ आलेल्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात पुन्हा धरणामध्ये शिरला. यामुळे गढूळ पाणी येत असल्याची परिसरात चर्चा आहे. गाळाची योग्य विल्हेवाट लावली असती तर ही समस्या उदभवली नसती. दोन दिवसांत शेकडो रुग्णांची नोंदअंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णांलयामध्ये दोन दिवसांत शेकडोे रुग्णांची नोंद झाल्याचे दिसून येते. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार बळावत असून यामुळे खासगी व शासकीय रूग्णालयांमध्ये रूग्णांची चिकार गर्दी दिसून येत आहे. विनापरवाना नळ कनेक्शन घेणाऱ्यांनाच दूषित पाणीस्थानिक काही लोकांनी त्यांच्या रहात्या घरी विनापरवाना खड्डे खोदून नळ कनेक्शन घेतले. त्यांच्याच घरी खड्ड्यांमधून गढूळ पाणी पुरवठा होत आहे. शहानूर जल प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा हा शुध्दच आहे. असे मजिप्राचे उपअभियंता डी.के.राऊत यांनी सांगितले.