अंबाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना २६ जानेवारी २००२ मध्ये झाली. त्यानंतर आरोग्य केंद्राच्या इमारतीसह निवासस्थानासाठी सीतारामजी राठी यांनी २ एकर जागा देऊन २००७ मध्ये इमारतीचे बांधकाम केले. पण, १५ वर्षांपासून निवासस्थानच्या बांधकामाचा प्रश्न राजकीय पदधिकाऱ्यांना सोडविता आला नाही.
कर्मचारी वर्गासाठी निवासस्थाने नसल्याने या केंद्रतील वैद्यकीय अधिकारीसह इतर कर्मचारी गावात मुक्कामी राहत नाही. कर्मचारी वर्गाच्या मते गावात खोल्या मिळत नाही. त्यामुळे आम्ही मोर्शी तथा अमरावतीहून ये-जा करतो, असे म्हणणे आहे.
काही महिन्यासाठी जि.प. सदस्य सारंग खोडस्कर यांच्या प्रयत्नाने कर्मचारी वर्गाच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी शासनाकडून ४ कोटी १२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला. या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. बांधाकामाचा ठेका महेश घाडगे याला देण्यात आला. पण अद्याप राजकीय पदाधिकाऱ्यांकडून भूमिपूजनाला मुहूर्त मिळाला नसल्याने कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. ते सोयीने बदली करून घेतात. रुग्णांनासुद्धा आरोग्य सेवा मिळत नाही. आरोग्य केंद्र असूनसुद्धा गर्भवती प्रसूतीकरिता महिलांना मोर्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविले जातात. आरोग्य केंद्राभोवती संरक्षण भिंत नसल्याने मोकाट जनावरे तेथे फिरतात. समाज कंटक सुटीच्या दिवसी आवारात जुगार खेळतात. केंद्राला परिसरातील १९ गावे जोडली असून कर्मचारी निवासस्थान नसल्याने आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. पालकमंत्री, आमदार, जिल्हा परिषद पदधिकारी आदींनी प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.
- प्रतिक्रिया-
१)कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामासाठी मी अनिल गोंडाने जि.प. अध्यक्ष असताना ४ कोटी १२ लक्ष रुपये मंजूर करून घेतले. महिनाभराच्या आत पालकमंत्र्यांची तारीख घेऊन भूमिपूजन पार पाडता येईल. बांधकाम त्वरित व्हावे, हा माझा प्रयत्न आहे.
- सारंग खोडस्कर (जि.प. सदस्य अंबाडा)
२)कर्मचारी वर्गाला हक्काचे निवासस्थान नसल्याने ते मुख्यालयी राहत नाही. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी निवासस्थानाच्या इमारतीचे उद्घाटन होणे गरजेचे आहे.
डॉ.महेश जैस्वाल(तालुका आरोग्य अधिकारी)
250721\img_20210721_131212.jpg~250721\img-20210725-wa0016.jpg
P H C Ambada~Z.P. Member Sarang Khodaskar