लोकमत न्यूज नेटवर्कचांदूररेल्वे : शहरात उड्डाणपुलाच्या निर्मितीने वेग घेतल्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी थांबणार आहे. शहर अपघातमुक्त होऊन वाहतूक सुकर व्हावी, यासाठी आमदार वीरेंद्र जगताप यांनी या उडडाणपुलाची मुहूर्तमेढ रोवली.चांदूररेल्वे शहरात तहसील, पोलीस ठाणे, कृषी कार्यालय, महाविद्यालये, दवाखाने, रेल्वे, बस आगार व अन्य महत्त्वाची कार्यालये असल्याने तालुक्यातील हजारो नागरिक विविध कामानिमित्त शहरात दररोज ये-जा करतात. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर ताण पडत आहे. शहरातील शिवाजीनगर येथील रेल्वे फाटकानजीक अधिक वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. जनतेला होणारा हा त्रास लक्षात घेऊन आमदार वीरेंद्र जगताप यांनी पाठपुरावा करून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून रात्री १ वाजता उड्डाणपुलाचे आश्वासन मिळवून घेतले. लगेच पुढील अर्थसंकलपीय अधिवेशनात ६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करवून घेतली. सद्यस्थितीत उडडाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. ते काम ५० टक्के पूर्ण झाल्याची माहिती आहे. या उड्डाणपुलामुळे शेकडो नागरिकांचा वेळ आणि होणारा त्रास कमी होईल, अशी सांघिक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
चांदूर रेल्वे शहरात उड्डाणपुलाच्या निर्मितीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST
चांदूररेल्वे शहरात तहसील, पोलीस ठाणे, कृषी कार्यालय, महाविद्यालये, दवाखाने, रेल्वे, बस आगार व अन्य महत्त्वाची कार्यालये असल्याने तालुक्यातील हजारो नागरिक विविध कामानिमित्त शहरात दररोज ये-जा करतात. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर ताण पडत आहे.
चांदूर रेल्वे शहरात उड्डाणपुलाच्या निर्मितीला वेग
ठळक मुद्देआश्वासनपूर्ती : वीरेंद्र जगताप यांचा यशस्वी पाठपुरावा