शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभाग ‘बेवारस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:35 IST

महापालिकेचा बांधकाम विभाग कार्यकारी आणि शहर अभियंत्याविना पांगळा झाला आहे. बांधकाम विभागाशी संबंधित तीनही खुर्च्या अधिकाऱ्यांविना खाली असल्याने कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिलेला नाही.

ठळक मुद्देपोतदार रजेवर : कर्मचारी, अधिकारी सुसाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेचा बांधकाम विभाग कार्यकारी आणि शहर अभियंत्याविना पांगळा झाला आहे. बांधकाम विभागाशी संबंधित तीनही खुर्च्या अधिकाऱ्यांविना खाली असल्याने कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिलेला नाही.शहर अभियंता, कार्यकारी अभियंता १ व २ या तीनही महत्त्पूर्ण पदांचा कार्यभार सेवानिवृत्त अभियंता अनंत पोतदार यांच्याकडे देण्यात आला आहे. ते मागील आठवड्यात रजेवर गेल्याने बांधकाम विभागातील बहुतांश कामे रखडली आहेत. बांधकाम व अन्य बाबतीतल्या साºया योजनांचे कार्यान्वयन शहर अभियंता, कार्यकारी अभियंता १ व २ कडे आहे. तूर्तास नगरोत्थान, डीपीसीतून मिळालेल्या ७.३६ कोटीच्या कामांसह राजापेठ उड्डाणपूल, छत्रीतलाव, ट्रान्सपोर्टनगर व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. आरोग्य, नगररचना, कर या विभागांसोबतच बांधकाम विभागाचे महत्त्व सर्वाधिक आहे. मात्र, मागील साडेतीन वर्षांपासून या महत्त्वपूर्ण विभागाला कंत्राटीचे ग्रहण लागले आहे. तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांचे सेवानिवृत्त अभियंता जीवन सदार यांच्यावर अधिक जीव असल्याने मागील तीन वर्षात गहरवार, संतोष जाधव, सोनवणे व पवार हे चार अभियंते महापालिकेतून परत गेले. ज्यांना बेकायदा नियुक्ती दिली, त्या सदारांचा कंत्राटी कार्यकाळही जूनमध्ये संपला. त्यानंतरही पूर्णवेळ प्रतिनियुक्तीचा शहर अभियंता महापालिकेला न मिळाल्याने पुन्हा ते पद कंत्राटी पोतदारांकडे देण्यात आले. पोतदारांच्या मर्यादा स्पष्ट आहेत. अनेक उपअभियंते, सहायक अभियंते व कर्मचारी शोधूनही बांधकाम विभागात सापडत नाहीत. एकंदर मागील तीन वर्षांत प्रतिनियुक्तीवर अभियंता नसल्याने बांधकाम विभागाची रया गेली आहे.नव्या आयुक्तांकडून हवा पाठपुरावासदारांच्या कंत्राटी कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम विभागाने चार कार्यकारी अभियंता महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविले. मात्र, सदार स्थानापन्न असल्याने पवारांनी त्यांच्याकडे कार्यकारी अभियंता-२ पदभार दिला. शहर अभियंता हे पद प्रतिनियुक्तीचे असल्यानंतरही चार ज्येष्ठ अभियंत्यांना संधी नाकारली गेली. त्यामुळे आता नवे आयुक्त संजय निपाणे यांनी शासनस्तरावरून पाठपुरावा करून शहर अभियंता आणावा, अशी अपेक्षा आहे.जाधव रूजू झालेच नाहीतमागील आठ महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने संतोष जाधव या कार्यकारी अभियंत्याची महापालिकेत बदली केली. मात्र, सदारांच्या आधीचा त्यांचा अनुभव फारसा चांगला नसल्याने आणि गहरवार, सोनवणे आणि पवारांशी महापालिकेने काय केले, हे ज्ञात असल्याने जाधव रुजूच झाले नाही. रुजू झाल्यास आपल्याकडेही शौचालय, घरकुल योजनांचे कार्यान्वयन दिले जाईल, अशी खात्री असल्याने जाधवांनी परस्पर अन्यत्र बदली करून घेतली.