शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

२७८ ग्रामपंचायतींची होणार प्रभाग रचना

By admin | Updated: May 30, 2017 00:06 IST

जिल्ह्यातील २७८ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ मध्ये संपुष्टात येत आहे.

आयोगाची लगबग : सप्टेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक, प्रभाग रचनेसाठी ‘गुगल मॅप’चा वापर लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील २७८ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ मध्ये संपुष्टात येत आहे. याठिकाणी सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी आयोगाची पूर्वतयारी सुरू आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. याआठवड्यात सर्व ग्रामपंचायतींची प्रभागरचना करण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींच्या नावाने ‘गुगल अर्थ’ वरुन नकाशे डाऊनलोड करण्यात येणार आहेत. प्रत्येक तहसीलदारांव्दारे ही कारवाई केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात दोन संगणकतज्ज्ञांची नियुक्ती केली जाईल. ही प्रक्रिया तीन जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आयोगाचे आदेश आहेत.याकालावधीमध्ये राज्यातील ८,३१३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील २७८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासर्व ग्रामपंचायतींच्या २,१०९ सदस्यपदांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीची पूर्वतयारी आयोगाव्दारा तीन टप्प्यांत होणार आहे. यामध्ये प्रभागरचना व आरक्षण, प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन व प्रत्यक्ष निवडणूक अशी प्रक्रिया राहणार आहे. ‘गुगल मॅप’वर तयार केलेल्या नकाशावर प्रचलित पद्धतीने प्रभाग पाडण्यात येणार आहेत. यामध्ये दक्षिण दिशेकडून सुरूवात करुन घड्याळाच्या काटयाच्या दिशेने ही रचना असेल. यानंतर अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. ग्रामसभेत महिलांसाठी सोडतअमरावती : तहसीलदार अध्यक्ष असलेली समिती या प्रभागरचनेला मान्यता देईल. प्रारुप प्रभागावर नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची विशेष सोडत ग्रामसभेव्दारा काढण्यात येणार आहे. प्रभागरचना करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अमरावती तालुक्यातील अमला, देवरी, गोपाळपूर, जळका शहापूर, कामुंजा, काटआमला, कुंड सर्जापूर, लोणटेक, नांदूरा पिंगळाई, पार्डी, सुकळी, वलगाव, भातकुली तालुक्यातील शिवणी, पूर्णानगर, सोनारखेडा, खालकोनी, हरतोटी, खोलापूर, परलाम, कानफोेडी, पोहरा पूर्णा, बैलमारखेडा, वाकी रायपूर, नांदगाव तालुक्यातील भगूरा, कोदोरी, खिरसाना, माहुली चोर, साखरा, पुसनेर, चिखली वैद्य, वडाळा, खेडपिंप्री, सावनेर, रोहणा, पिंपळगाव, शेलुगूड, येवती, लोहगाव, काजना, पाळा, चांदूरबाजार तालुक्यातील आखतवाडा, बेलज, बेलमंडळी, बेलोरा, बोदड, बोरगाव मोहना, चिंचोली काळे, धानोरा पूर्णा, घाटलाडकी, गोविंदपूर, हैदतपूर, जैनपूर, कल्होडी, कोंडवर्धा, लाखनवाडी, मासोद, मिर्झापूर,निंबोरा, रसुलापूर रतनपूर, रेडवा, सर्फापूर, टाकरखेडा, तळणी,तळवेल चांदुररेल्वे तालुक्यातील सोनगाव, राजणा, दहिगाव, कळमगाव, कोहळा, धोत्रा, भिलटेक, कवठा, टेभूर्णी, निंबा, मांजरखेड, सावंगी, मांडवा, टोंगलाबाद, दिघी, कलमजापूर, बागापूर तिवसा तालुक्यातील वरुडा, फत्तेपूर, करजगाव, वणी, निंबोरा, पालवाडी, डेहणी, शेंदुरजना खुर्द, अनकवाडी, दुर्गवाडा, कौंडण्यपूर व सालोरा, मोर्शी तालुक्यातील हिवरखेड, दुर्गवाडा, भांबोरा, बेलोना, पिंपळखुटा, पातूर, तळेगाव, तळणी, आखतवाडा, धनोरा, गणेशपूर, विष्णोरा, घोडगव्हाण, बऱ्हानपूर, शिरलस, लेहेगाव, डोमक, वाघोली, शिरजगाव, मंगरूळ, आष्टगाव, पिंपळखुटा (लहान), भिलापूर, उमरखेड, मनीमपूर, गोराळा, रिद्धपूर, ब्राह्मणवाडा. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खिरगव्हाण, चिंचोली बु., चिंचोली खु., जवर्डी, बोराळा, मालकापूर, सेलगाव, सोनगाव, हिंगणी, खोडगाव, हंतोडा, हसनापूर, हिरापूर. वरूड तालुक्यातील आलोडा, बाभुळखेडा, बोरगाव, बेलोरा, बेसखेडा, डवरगाव, गव्हाणकुंड, इसंब्री, इसापूर, जामगाव, खडका, मोरचूद, नांदगाव, पळसोना, पळसवाडा, पिंपळखुटा, पोरगव्हाण, सावंगा, सिंगोरी, तिवसाघाट, वाळेगाव, वंडली. दर्यापूर तालुक्यातील घोडचंदी, सुकळी, चांदोळा, पेठ इतबारपूर, गोळेगाव, नरसिंगपूर, एरंडगाव, पिंपळखुटा, तेलखेडा, हिंगणी, बेलोरा, चंद्रपूर, माटरगाव, जसापूर, नायगाव, डोंगरगाव, टाकळी, म्हैसपूर, वडुरा, महिमापूर, खैरी, घडा, सावंगा बु., अचलपूर तालुक्यातील भिलोना, तुळजापूर, चमक खु., चमक बु., बळेगाव, सावडी, वाघडोह, कासमपूर, रामापूर बु, उपातखेडा, जवळापूर, एलकी, हिवरा, जवर्डी, वासनी बु., वासनी खु., रामापूर बेलज, काकडा, असदपूर, शहापूर, दोनोडा, चिखलदारा तालुक्यातील मोरगड, गडगा भांडूम, गौलखेडा, धरमडोह, तेलखार, अंबापाटी, जामली, बोराडा, खडीमल, टेंब्रुसोंडा, कुलंगणा, वसतापूर, गांगरखेडा, कोयलारी, बदनापूर, बामादेही, चुरणी, राहू, भूलोरी, मेहरीअम, आवागड, हतरू, सोनापूर, कोरडा, काटकुंभ, चिंचखेड. धारणी तालुक्यातील धुळघाट, मोगर्दा, सावलीखेडा, सुसर्दा, काकरमल, नागझिरा, चिचघाट, बिजूधावडी, दाबीदा, साद्राबाडी, रानापिसा, कुसुमकोट, हरदोली, टिटंबा, बिबामल, झिल्पी, तातरा, रानामालूर, खापरखेडा, बैरागढ, चाकर्दा, बोबदो, राजपूर, धुळघाट रेल्वे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अशी राहणार प्रभागाची सरासरी लोकसंख्याग्रामपंचायतींची प्रभाग रचनना २०११ च्या जनगणनेनुसार राणार आहे. एकून जनगणना भागीले ग्रामपंचाजतींची सदस्यसंख्या या सुत्रानूसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या निच्छित करण्यात येणार आहे.प्रभागाची लोकसंख्या त्या ग्रामपंचायतींच्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के कमी किंवा १० टक्के जास्त या मर्यादेत ठेवन्याचे आयोगाचे निर्देश आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे निवडणूक आयुक्त निवडणूक विभागासी व्हीसी व्दारे संवाद साधणार असल्याची माहीती आहे.