शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट पूर्वनियोजित : ॲड. यशोमती ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 05:00 IST

त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे चुकीचे वर्णन करून तेढ निर्माण करणाऱ्या या पोस्ट ताबडतोब काढून टाकाव्यात, अशा सूचना सायबर विभागाने दिल्या आहेत. या सर्व प्रकारांमध्ये जनतेच्या धार्मिक भावना भडकवून महाराष्ट्रात असंतोष निर्माण करुन अस्थिरता निर्माण करावी आणि त्याचा फायदा मतांचे ध्रुवीकरणसाठी करावा, यासाठी हा सर्व पूर्वनियोजित कट होता, असा दावा पालकमंत्री ठाकूर यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात १२ आणि १३ नोव्हेंबरला झालेली दंगल आणि हिंसाचाराच्या घटना या पूर्वनियोजित होत्या, असा दावा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. हिंसाचाराच्या घटनांसंबंधी भाजपा नेत्यांनी पोलिसांसमोर समर्पण केल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. अमरावतीमध्ये गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता, अशा पद्धतीची माहिती आणि अहवाल नोडल एजन्सी असलेल्या सायबर विभागाने दिला आहे. या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय विखारी पोस्ट आणि प्रचार दोन्ही बाजूंच्या कट्टरवादी विचारांच्या लोकांमार्फत करण्यात आला, असे सायबर विभागाच्या अहवालावरून  दिसून येते. कारण यामुळे ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा कोणाला होईल, हे स्पष्टच आहे, अशी पुस्तीही ठाकूर यांनी जोडली. दरम्यान सायबर विभागाने दिलेल्या अहवालानुसार १२ व १३ नोव्हेंबरला #AmravatiVoilence हा हॅशटॅग वापरून अवघ्या काही मिनिटांतच चार हजार ट्विट्स तसेच पोस्ट करण्यात आले तसेच ट्विटर, फेसबूक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून केलेल्या पोस्ट या अत्यंत भडक आणि भावना भडकवणाऱ्या होत्या, तर त्यासोबत जोडण्यात आलेल्या चित्रफिती या चुकीची माहिती देऊन विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणाऱ्या होत्या. त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे चुकीचे वर्णन करून तेढ निर्माण करणाऱ्या या पोस्ट ताबडतोब काढून टाकाव्यात, अशा सूचना सायबर विभागाने दिल्या आहेत. या सर्व प्रकारांमध्ये जनतेच्या धार्मिक भावना भडकवून महाराष्ट्रात असंतोष निर्माण करुन अस्थिरता निर्माण करावी आणि त्याचा फायदा मतांचे ध्रुवीकरणसाठी करावा, यासाठी हा सर्व पूर्वनियोजित कट होता, असा दावा पालकमंत्री ठाकूर यांनी केला आहे.घडलेल्या हिंसाचारामागे दोन्ही बाजुंच्या कट्टरवादी गटांचा एकत्रितरीत्या समावेश होता तसेच या माध्यमातून नेमका कुणाला फायदा होणार, हे जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता सामाजिक एकोपा व शांतता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर