शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट पूर्वनियोजित; ॲड. यशोमती ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 07:00 IST

Amravati News अमरावती शहरात १२ आणि १३ नोव्हेंबरला झालेली दंगल आणि हिंसाचाराच्या घटना या पूर्वनियोजित होत्या, असा दावा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

अमरावती : शहरात १२ आणि १३ नोव्हेंबरला झालेली दंगल आणि हिंसाचाराच्या घटना या पूर्वनियोजित होत्या, असा दावा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. हिंसाचाराच्या घटनांसंबंधी भाजपा नेत्यांनी पोलिसांसमोर समर्पण केल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. 

अमरावतीमध्ये गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता, अशा पद्धतीची माहिती आणि अहवाल नोडल एजन्सी असलेल्या सायबर विभागाने दिला आहे. या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय विखारी पोस्ट आणि प्रचार दोन्ही बाजूंच्या कट्टरवादी विचारांच्या लोकांमार्फत करण्यात आला, असे सायबर विभागाच्या अहवालावरून  दिसून येते. कारण यामुळे ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा कोणाला होईल, हे स्पष्टच आहे, अशी पुस्तीही ठाकूर यांनी जोडली. 

दरम्यान सायबर विभागाने दिलेल्या अहवालानुसार १२ व १३ नोव्हेंबरला #AmravatiVoilence हा हॅशटॅग वापरून अवघ्या काही मिनिटांतच चार हजार ट्विट्स तसेच पोस्ट करण्यात आले तसेच ट्विटर, फेसबूक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून केलेल्या पोस्ट या अत्यंत भडक आणि भावना भडकवणाऱ्या होत्या, तर त्यासोबत जोडण्यात आलेल्या चित्रफिती या चुकीची माहिती देऊन विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणाऱ्या होत्या. त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे चुकीचे वर्णन करून तेढ निर्माण करणाऱ्या या पोस्ट ताबडतोब काढून टाकाव्यात, अशा सूचना सायबर विभागाने दिल्या आहेत. या सर्व प्रकारांमध्ये जनतेच्या धार्मिक भावना भडकवून महाराष्ट्रात असंतोष निर्माण करुन अस्थिरता निर्माण करावी आणि त्याचा फायदा मतांचे ध्रुवीकरणसाठी करावा, यासाठी हा सर्व पूर्वनियोजित कट होता, असा दावा पालकमंत्री ठाकूर यांनी केला आहे.

घडलेल्या हिंसाचारामागे दोन्ही बाजुंच्या कट्टरवादी गटांचा एकत्रितरीत्या समावेश होता तसेच या माध्यमातून नेमका कुणाला फायदा होणार, हे जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता सामाजिक एकोपा व शांतता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर