शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेश, अमरावतीतून येते खेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 23:38 IST

शहरातील युवक मोठ्या प्रमाणात दारू आणि गांजा या नशेच्या आहारी गेल्याचे चित्र असून, याची विक्री अतिक्रमित असलेल्या विशिष्ट पानटपरीवरून केली जाते. मध्यप्रदेशच्या बºहाणपूर, धारणी, बहिरम आणि बडनेरा, अमरावती मार्गे हा अवैध माल येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देजुळ्या नगरीतील युवक नशेच्या आहारी : ‘दम मारो दम’ची क्रेझ, गांजाची चौकाचौकात विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरातील युवक मोठ्या प्रमाणात दारू आणि गांजा या नशेच्या आहारी गेल्याचे चित्र असून, याची विक्री अतिक्रमित असलेल्या विशिष्ट पानटपरीवरून केली जाते. मध्यप्रदेशच्या बºहाणपूर, धारणी, बहिरम आणि बडनेरा, अमरावती मार्गे हा अवैध माल येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.परतवाडा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील मुगलाईपुरा भागातून इम्रान खान हैदर खान (३०) या गांजातस्कराला अटक केली. त्याच्या जवळून २० किलो माल हस्तगत गेला. चार दिवसांपूर्वी अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी दिनेशसिंग रामसिंग बालोदिया व जया दिनेश बालोदिया (३८, रा. कविठा रोड कांडली) या पतीपत्नीला २० किलो गांजासह ताब्यात घेतले. त्यामुळे जुळ्या शहरांत मोठ्या प्रमाणात गांजाविक्री होत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरांतील युवकांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणि गांजा विक्री करण्यासह त्याचा नशा करण्याचे प्रमाण वाढले. त्यांचे विशिष्ट अड्डे असून, ठरावीक ग्राहकांच्या माध्यमातून विक्री केली जाते. परतवाडा, अचलपूर शहरांतील काही विशिष्ट जागांवर अतिक्रमण करून चहा आणि पानटपरीचा व्यवसाय, धाबे, हॉटेलमध्ये मध्य प्रदेशातील बनावट विदेशी दारू आणि गांजा विकला जातो. शिरजगाव पोलिसांनी गत आठवड्यात बहिरम जवळ नाकाबंदी करून परतवाडा येथील दोघांना मध्यप्रदेशाच्या विदेशी दारूसह पकडले होते. मात्र, त्यानंतर एक्ससाइज विभागाकडून अपेक्षित धाडसत्र राबविले गेले नाही.हे आहेत शौकिनांचे ठिय्येपरतवाडा शहरात गांजा विक्री आणि ओठाण्यासाठी (पिण्यासाठी) विशिष्ट ठिकाण शहरात आहेत. त्यामध्ये धारणी-चिखलदराकडे जाणारा वाय पॉइंट, परेड ग्राउंड, आठवडी बाजार, बाजार समितीमागचा भाग, हिंदू स्मशानभूमी, गळंकी रोड, इंग्रज बिल्डींग, चिखलदरा स्टॉप, रेस्ट हाऊस प्रांगण, तेथीलच एक कॉम्प्लेक्स, कविठा स्टॉप, गल्ली नं. ३ आदी ठिकाणी हमखास गांजा आणि अवैध दारू पिणारे तसेच विकणारे दिसून येतात. परतवाडा पोलिसांनीसुद्धा या जागांवर आता लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.धारणी, अमरावती मार्गे येतो शहरातपरतवाडा शहरात गांजा बऱ्हाणपूर, धारणी बैतुल, बहिरम, बडनेरा अमरावती मार्गे आंध्रप्रदेश, तेलंगणा येथून येत असल्याचे आरोपींनी पोलीस तपासात स्पष्ट केले. त्यामुळे पकडण्यात आलेल्या आतापर्यंतच्या गांजा व विदेशी दारू तस्करांचा म्होरक्या कोण? यात किती गँग चा समावेश आहे? कुणाच्या हातमिळणीने हे अवैध व्यवसाय फोफावले? आदी सर्व बाबी पोलिसांनी तपासण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात युवक या नशेच्या आहारी गेल्यानेच त्यासाठी गरजेनुसार चोऱ्या, लुटमार, हाणामारी, हत्यासारखे प्रकार वाढले आहेत, हे विशेषशहरातील गांजा व अवैध धंदे करणाºयांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्या ठिकाणावर दिवसभर नजर ठेवली जात आहे. येण्याचे मार्ग, तस्करांची माहिती गोळा केली जात आहे.- संजय सोळंकेठाणेदार, परतवाडा