शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसतर्फे आमदार निलंबनाचा निषेध

By admin | Updated: March 25, 2017 00:12 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक पवित्रा घेणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी कर्जमाफीचा उल्लेख...

बबलू देशमुख : ही तर भाजप सरकारची मुस्कटदाबी अमरावती : अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक पवित्रा घेणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी कर्जमाफीचा उल्लेख आणि तरतूद अर्थसंकल्पात न केल्याने याविरोधात विधान भवनात घोषणा देऊन भाजप सरकारला जेरीस आणले. कर्जमाफी न देता उलट विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आले. भाजप सरकारकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करीत जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध नोंदविला.निवडणुकीत भाजपाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन शेतकरी व सर्वसामान्यांची फसवणूकच केली. नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा केली. भाजप सरकार सत्तेत आल्यास १५ दिवसांच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, अशी गर्जना केली होती. मात्र आता त्यांनी मौन धारण केले आहे. अशातच राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. परिणामी कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस कमी न होता वाढत आहेत. भाजप सरकारला शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे.कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाजपने निलंबित केलेल्या सर्व आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, प्रकाश काळबांडे, श्रीरामजी नेहर, जयंतराव देशमुख, संजय वानखडे, छाया दंडाळे, गणेश आरेकर, मोहन सिंघवी, प्रवीण घुईखेडकर, महेंद्र गहेलवार, दयाराम काळे, सतीश हाडोळे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)ही तर लोकशाहीची हत्याच : देशमुखअधिवेशनात कर्जमाफीच्या चर्चेत कर्जमाफी जाहीर व्हावी, यासाठी सभागृहात घोषणा देणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १९ आमदारांचे निलंबन करण्याची कारवाई हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असून याचा मी तीव्रपणे निषेध करतो. शेतकरी व विरोधी आमदार यांचा आवाज दडपण्याचा प्रकार लोकशाही मुख्यांना काळीमा फासणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केली.