शेखावतांमध्ये दिलजमाई : सर्वसहमतीने निवड अमरावती: माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी निवडलेल्या व्यक्तींच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही कांग्रेसचे गटनेता बबलू शेखावत यांनी दिली आहे. त्यामुळे शेखावतांनीच निवडलेला व्यक्तींच्या नावावर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांकडून शिक्कामोर्तब केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांग्रेसच्या शहराध्यक्ष कोण? यावर बरीच खलबते रंगत असतांना शेखावतांमधील दिलजमाईने ही कोंडी फुटली आहे. विद्यमान शहराध्यक्ष संजय अकर्ते यांचा कार्यकाळ संपुष्ठात येत असतांना कांग्रेस वर्तुळात नवा शहराध्यक्ष कोण? यासाठी चढाओढ माजली आहे. गटनेते बबलू शेखावत यांनी शहाध्यक्षपद आपलाच पदरात पडावे यासाठी थेट प्रदेशाध्यक्षांकडे शक्ती प्र दर्शन केले. या राजकमीय वादात शेखावत बंधूमध्ये मत-मतांतरे झाली. रावसाहेब शेखावतांनी महापालिकेतील कांग्रेसी नगरसेवकांसह कार्यकारिणीतील जेष्ठांची याबाबत सल्लामसलत केली व बबलू शेखावतांऐवजी कांग्रेस शहाध्यक्षपदासाठी अनुभव व्यक्तीचे नाव प्रदेशाध्यक्षापर्यंत पाठविण्याचे ठरले. त्यानंतर कांग्रेसमध्ये गटातराचे राजकारण सुरु आहे.मात्र त्यानंतर शेखावत बंधूसह ज्येष्ठांनी एकत्र येत सन्मान्य तोडगा काढला. तो तोडगा बबलू शेखावतांनाही मान्य आहे. रावसाहेब शेखावत यांनी सुचविलेली व्यक्तींच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा निर्णय मान्य राहील असे बबलू शेखावतांनी स्पष्ट केल्याने शहराध्यक्षपदाचा तिढा संपल्यातच जमा आहे.
काँग्रेस शहराध्यक्षपदाचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात!
By admin | Updated: May 15, 2016 00:04 IST