शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस माझा श्वास!

By admin | Updated: October 12, 2014 23:29 IST

माजी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव पेठ येथे रविवारी पार पडलेल्या प्रचार सभेत आ. यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस माझा श्वास असून मी मरेपर्यंत तो कायम राहील,

प्रचार सभा : यशोमती ठाकूर यांचे पंजाला मतदान करण्याचे भावनिक आवाहनअमरावती : माजी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव पेठ येथे रविवारी पार पडलेल्या प्रचार सभेत आ. यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस माझा श्वास असून मी मरेपर्यंत तो कायम राहील, काँग्रेसलाच मते द्या, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. अनेक संकटे उभी असली तरीही विकासकामांच्या भरवशावर जनतेपुढे जात असून आपण जिंकणारच! असा दावा त्यांनी केला.प्रचार सभेला महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष शोभा ओझा, कमल व्यवहारे, माजी आ. भय्यासाहेब ठाकूर, सुखदेव पानसे, चरणदास इंगोले, हरिशंकर अग्रवाल, विभा देशमुख, मो.साबीर, नारायण यावले, श्रद्धा बेलसरे, भय्या पवार, स्वप्निल कोकाटे, विनोद डांगे आदी उपस्थित होते. हजारोच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, तिवसा मतदारसंघात चौफेर विकास केला. मात्र काही राजकीय विरोधक केवळ अपप्रचार करीत आहेत. काहींनी तर रात्रीतून पक्ष बदलला, कोणता झेंडा हाती घेतला हेसुद्धा त्यांना कळले नाही. मात्र; मी जन्माला आले तेव्हापासूनच काँग्रेस संस्कृतीचे बाळकडू प्राशन केले. वडिलांचे बोट धरुन राजकारण, समाजकारणाला सुरुवात केली. अनेक संकटे आली तरी काँग्रेसला सोडले नाही. काँग्रेसने ओळख दिली, नाव दिले, राजकारणात मोठे केले. त्यामुळे माझा श्वास हा काँग्रेस असून मरेपर्यंत या पक्षाला सोडणार नाही, असे म्हणत यशोमती भावनिक झाल्या. माझ्या विरोधात भांडवलदार एकवटले, कितीही आव्हाने आली तरी विकास कामांच्या भरोवशावर ही निवडणूक मी जिंकणारच, असे त्या म्हणाल्या.