शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

चिखलदरा पालिकेवर काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : येथील नगरपालिकेच्या गुरुवारी लागलेल्या निकालात काँग्रेसने नगराध्यक्षपदासह १७ पैकी तब्बल १२ जागांवर विजय संपादन केला. भाजपला पाच जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपने परिवर्तनाचा दिलेला नारा नाकारत चिखलदरावासीयांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसला साथ दिली आहे.भाजपने केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज प्रचारासाठी मैदानात उतरविले होते. मात्र, त्याचा प्रभाव मतदारांवर पडला नाही. ...

ठळक मुद्देपरिवर्तन झालेच नाही : भाजप पाच जागांवर थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : येथील नगरपालिकेच्या गुरुवारी लागलेल्या निकालात काँग्रेसने नगराध्यक्षपदासह १७ पैकी तब्बल १२ जागांवर विजय संपादन केला. भाजपला पाच जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपने परिवर्तनाचा दिलेला नारा नाकारत चिखलदरावासीयांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसला साथ दिली आहे.भाजपने केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज प्रचारासाठी मैदानात उतरविले होते. मात्र, त्याचा प्रभाव मतदारांवर पडला नाही. चिखलदरावासीयांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसला साथ दिली. काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके, माजी आमदार केवलराम काळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी या त्रिमूर्तीने सर्व पदाधिकारी व काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेत गड राखला. भाजपचे सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.निसटता विजय : काँग्रेसच्या सुवर्णा चंदामी, वंदना गवई प्रत्येकी २, मीनल सिंगरोल ५, राजेश मांगलेकर १५, तर नीता सोमवंशी १६ मतांनी विजयी झाल्या आहेत. अपक्षांना विजयाच्या जवळपासही फिरकता आले नाही.सर्वाधिकार सोमवंशींनाचिखलदरा : नगरपालिकेवर राजेंद्रसिंह सोमवंशी यांच्या माध्यमातून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या निवडणुकीतही काँग्रेस नेत्यांनी त्यांनाच सर्वाधिकार दिले होते. राजेंद्रसिंह सोमवंशी, केवलराम काळे व संजय खोडके या त्रयींसमवेत दयाराम काळे, महेंद्रसिंह गैलवार, मिश्रीलाल झाडखंडे, श्रीपाल पाल, कविता काळे, मनोज शर्मा, जब्बारभाई, सहबूभाई, ओम मिश्रा, अमिरभाई, भिक्कनभाई, नासीर गणी, अफसर हुसैन, प्रदीप चव्हाण, आदर्श गजभिये, दानियल चव्हाण, शफीभाई, अमर गवई आदींनी विजयाकरिता परिश्रम घेतले.नगराध्यक्षपदाचे अंतर ३१७ मतांचेथेट नगराध्यक्षपदावर काँग्रेसच्या विजया राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपच्या दुर्गा चौबे यांना ३१७ मतांनी मात मात दिली. विजया सोमवंशी यांना १७२४, तर दुर्गा चौबे यांना १४०७ मते मिळाली. निर्णय घोषित झाल्यानंतर विजया सोमवंशी यांनी मतदारांचे आभार मानले.गड आला, पण सिंह गेलाकाँग्रेसने बड्या नेत्यांशिवाय किल्ला लढविला. त्यामुळे नगराध्यक्षपदासह १७ पैकी नगरसेवकांच्या १२ जागांवर विजय मिळविताना राजेंद्रसिंह सोमवंशी यांचा पराभव कॉँग्रेसजनांच्या मनाला चटका लावून गेला. ते ३१ डिसेंबर रोजी पायउतार होतील.अरुण तायडे पाचव्यांदा विजयीचिखलदरा नगरपालिकेत सर्वाधिक पाचव्यांदा सामाजिक कार्यकर्ते अरुण तायडे विजयी झाले आहेत. राजेश मांगलेकर यांनी हॅट्ट्रिक केली, तर मीनल सिंगरोल, नीता सोमवंशी, शेख अब्दुल शेख हैदर, मोना कासदेकर, गीता जामकर, शोभा तिडके आदी नगरसेवक दुसºयांदा विजयी झाले आहेत.