शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमन विरोधात शहर काँग्रेसने विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:26 IST

शहरात महावितरणद्वारा भारनियमन सुरू आहे. ते त्वरित बंद करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात वीज वितरण अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे ....

ठळक मुद्देदालनात ठिय्या : अखंडित वीजपुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात महावितरणद्वारा भारनियमन सुरू आहे. ते त्वरित बंद करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात वीज वितरण अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे यांना याबाबत जाब विचारला.सध्या शहरातील विविध फिडवर महावितरणकडून वेळीअवेळी भारनियमन केले जात आहे. त्यामुळे शहरातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. भारनियमामुळे शहराला एकदिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तोही मिळणे कठीण होऊन बसले आहे. परिणामी पाण्यासाठीही मुकावे लागते. वाढत्या भारनियमनामुळे नागरिकांसह, व्यापारी, वैद्यकीय क्षेत्र त्रस्त आहे. फिडरनिहाय केले जाणारे ८ ते ९ तासांचे भारनियम वेगवेगळे लादले जात आहे. विशेत: मुस्लीमबहुल भागात सर्वाधिक भारनियम होत असल्याने हा दूृजाभाव का, असा प्रश्न किशोर बोरकर, बबलू शेखावत, विलास इंगोले, गाजी जेहरोश आदींनी उपस्थित केला. वीज तुटीचे कारण पुढे करीत शंभर टक्के वसुली असताना नाहकपणे भारनियमन करण्यात येऊ नये, अशी मागणी शहर काँग्रेसने केली आहे. कडबी बाजार येथील वीज तक्रार निवारण केंद्र सतत बंद असल्याने येथील अभियंत्याला त्वरित निलंबित करण्याची मागणी प्रशांत डवरे यांनी केली. शहर काँग्रेस पदाधिकाºयांच्या तीव्र भावना लक्षात घेता शहरातील भारनियम येत्या आठवडाभरात बंद करण्यासह अन्य मुद्यावर योग्य कारवाईचे आश्वासन अधीक्षक अभियंता मेत्रे यांनी दिले. यावेळी राजा बांगळे, राजेश चव्हाण, वंंदना कंगाले, शेख आसिफ, साहेबराव घोघरे, हरिभाऊ मोहोड, अभिनंदन पेंढारी, देवायनी कुर्वे, अर्चना सवाई, जयश्री वानखडे, निसार मन्सुरी, नदीम मुल्ला, सागर देशमुख, योगिता गिरासे, कुंदा अनासाने, इसराईल खान, नसीम खान, अनिल माधोगडीया, सुगमचंद गुप्ता व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या आहेत आंदोलनातील मागण्यामजीप्राद्वारा एकदिवसा आड पाणीपुरवठा केला जात आहे. नेमके याच वेळी होणारे भारनियम बंद करावे, नवरात्र महोत्सव लक्षात घेता भारनयिमन करू नये, शेतकरी अर्जमाफीचे अर्ज आॅनलाईन भरण्यात येत असून भारनियमामुळे अडथळा होत आहे. भाजीबाजार परिसरातील फिडरवर असलेले वीज ग्राहकांची संख्या लक्षात घेता. या भागासाठी स्वतंत्र्य फिडर देण्यात यावे, मुस्लीमबहुल भागातील भारनियमनात केला जाणारा दुजाभाव त्वरित थांबविण्यात यावा सर्वांना समान न्याय द्यावा. येत्या आठवड्यात शहराला भारनियमन मुक्त करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.