शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:08 IST

शासनाने बंद केलेली तूर खरेदी केंद्र दोन दिवसांत सुरू न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हा काँग्रेसने दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : केंद्र सुरू न केल्यास आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने बंद केलेली तूर खरेदी केंद्र दोन दिवसांत सुरू न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हा काँग्रेसने दिला आहे.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तूर खरेदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली. जिल्हाभरात अद्यापही ३४ हजार शेतकऱ्यांच्या घरात तूर पडून असल्याचे बबलू देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच जिल्ह्यातील ७० हजार १९७ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असताना, अद्यापही ३४ हजार ६८५ टोकनधारक शेतकरी आहे. याशिवाय इतरही शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. असे असताना जिल्हाभरातील १२ ठिकाणचेही शासकीय तूर खरेदी केंद्र शासनाने १५ मेपासूृन बंद केली आहे. त्यामुळे या वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बंद असलेली तूर खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हाभर काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, माजी आमदार केवलराम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.तुरीची खरेदी पूर्ण न करताच ही खरेदी केंद्र बंद केली. भाजप सरकार हे शेतकरीविरोधी व थापाडे असल्याचा आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी केला. याप्रसंगी शिवाजी हरणे, बाळासाहेब टोळे, किशोर देशमुख, रत्नाकर करुले, श्रीपाल पाल आदी उपस्थित होते.