शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी मदतीसाठी कॉग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:18 IST

जिल्ह्यात कपाशीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे व गुलाबी बोंडअळीने बाधित चार तालुक्यांना मदतीतून डावलण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. या तालुक्यांचा यादीत समावेश करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ‘त्या’ चार तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात कपाशीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे व गुलाबी बोंडअळीने बाधित चार तालुक्यांना मदतीतून डावलण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. या तालुक्यांचा यादीत समावेश करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली आहे.जिल्ह्यातील दर्यापूर, अमरावती, भातकुली व चांदूररेल्वे या चार तालुक्यांत कपाशीचा सर्वाधिक पेरा आहे. याच तालुक्यात गुलाबी बोंडअळीचे सर्वाधिक नुकसान असताना या तालुक्यांना बोंडअळीच्या बाधित क्षेत्रातून वगळले आहे. दर्यापूर तालुक्यात ८० टक्क्यांवर बोंडअळीचे नुकसान असल्याचा नित्कर्ष पीकेव्हीने काढला. या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे वगळलेल्या या तालुक्यांना पुन्हा यादीमध्ये समाविष्ट करावे, अन्यथा होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांना शासन जाबबदार राहील, अशा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती बळवंत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर, दिलीप चव्हाण, राजेश्वर कोल्हे, दिवाकर देशमुख, शाम देशमुख, सागर देशमुख, गजानन देशमुख, अभिजित देवके, राजेश खेडकर, व्ही.के. देशमुख, सुरेश ढेंगळे, संजीव चव्हाण, दुर्योधन रायबोले, गजानन गावंडे, प्रदीप देशमुख, अविनाश देशमुख, पुरूषोत्तम देशमुख, प्रभाकर कोरपे, चंदू शेवणे, रमेश गावंडे, बाळासाहेब गावंडे, प्रकाश चव्हाण, अनिकेत टाले, सूरज देशमुख, विक्रम देशमुख आदींची उपस्थिती होती.शेतकऱ्यांसाठी निर्णय घातक; शिवसेनेचा आरोपअमरावती : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गुलाबी बोंडअळीचे नुकसान असताना पाच तालुक्यांना डावलण्याचा प्रकार निषेधार्ह व शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक निर्णय असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी केला. सरसकट शेतकऱ्यांना मदत न देता अटी, शर्तीमध्ये डावलून वंचित ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यात बोंडअळीच्या नुकसानीची पहिली तक्रार भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील असताना त्या तालुक्याला डावलण्यात आले आहे. या बाधित तालुक्यांना यादीत समाविष्ट करण्याची मागणी बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनाव्दारे करण्यात आली.