शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेवर काँग्रेसही आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 23:07 IST

शहरात जागोजागी पाणी व कचऱ्याचे ढीग साचल्याने घाणीचे साम्राज्य पाहता, आरोग्य विभागातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी घेऊन शुक्रवारी युवक काँग्रेसने महापालिका आयुक्तांना घेराव घातला. आयुक्तांना मच्छरदानी भेट देऊन कार्यकर्त्यांनी शहरातील स्वच्छतेच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतला होता.

ठळक मुद्देसीमा नैताम यांच्या निलंबनाची मागणी

अमरावती : शहरात जागोजागी पाणी व कचऱ्याचे ढीग साचल्याने घाणीचे साम्राज्य पाहता, आरोग्य विभागातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी घेऊन शुक्रवारी युवक काँग्रेसने महापालिका आयुक्तांना घेराव घातला. आयुक्तांना मच्छरदानी भेट देऊन कार्यकर्त्यांनी शहरातील स्वच्छतेच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतला होता.शहारात डेंग्यूने थैमान घातले असून या जीवघेण्या आजाराने अमरावतीकर बळी पडत आहेत. महालक्ष्मीनगर, पार्वतीनगर, अंबाविहार या परिसरात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तेथील नागरिक शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. काही रुग्णांना तर नागपूरला हलविण्यात आले आहे. ही परिस्थिती निर्माण झाली असताना शहरात डेंग्यूचे रुग्ण नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. महापालिका अधिकारी उपाययोजना सोडून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत.महापालिकेने ठोस पावले उचलावीतडेंग्यूविषयी जनजागृती, फॉगिंग मशीन व फवारणी करून नागरिकांना या संकटातून सोडविण्याचे प्रयत्न महापालिकेने करावेत, त्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी काँगे्रेसने केली . सोबतच आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना निलंबित करून सक्तीच्या रजेवर पाठवा, अशी मागणी युवक काँग्रेस अध्यक्ष राजा बागडे, समीर जवंजाळ आदींनी महापालिका आयुक्तांना निवेदनातून केली. आठ दिवसांत उपाययोजना न झाल्यास युवक काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, अशा इशाराही काँग्रेसने महापालिका आयुक्तांना दिला आहे.