शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला काँग्रेसतर्फे श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:04 IST

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले.

ठळक मुद्देकाळा दिवस : जिल्हा काँग्रेस कमिटीने केला भाजप सरकारचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. या निर्णयामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली. जिल्हा काँग्रेस कमिटीने हा काळा दिवस पाळला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मेणबत्ती पेटवून निषेध केला.नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेसह व्यापाºयांना याचा नाहक फटका बसला. दरम्यान ११४ लोकांचा रांगेत पैसे काढताना मृत्यूदेखील झाला. आर्थिक घडी कमालीची विस्कटली. त्यामुळे मोदी सरकारचा हा निर्णय जनहिताचा नसून तो अन्याय करणार ठरल्याचेही देशमुख म्हणाले. सर्वच पातळ्यांवर भाजप सरकार अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. विदेशातील काळा पैसा परत न आणता सर्वसामान्यांच्या खिशातील कष्टाचाच पैसा मोदी सरकारने जमा करून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी प्रकाशराव काळबांडे, भैयासाहेब मेटकर, हेमंत येवले, प्रल्हाद ठाकरे, संजय वानखडे, सतीश धोंडे, समाधान दहातोंडे, प्रदीप देशमुख, भागवत खांडे, सुभाष पाथरे, बापुराव गायकवाड, बाबाराव कडू, यशवंत मंगरोळे, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, विशाल भट्टड, शेखर दाभणे, दिलीप तायडे, गौरव पवार उपस्थित होते.भाजपचे धोरण जनहित विरोधी - बबलू देशमुखसत्तेत असलेल्या भाजप सरकारने तीन वर्षांत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. उलट जनहित विरोधी धोरण राबवून शेतकरी व सामान्यांना वेठीस धरण्याचेच काम केले. यात शेतकरी कर्जमाफी, वाढती महागाई, जीएसटी, असे बरेच निर्णयाने अच्छे दिनऐवजी बुरे दिन आणल्याचे बबलू देशमुख म्हणाले.