शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

भाजप शासनाविरोधात काँग्रसेचे नेते एकवटले

By admin | Updated: February 19, 2016 00:38 IST

भाजप सरकारने दुष्काळी परीस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी व सामान्यांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले

अमरावती : भाजप सरकारने दुष्काळी परीस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी व सामान्यांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. आकसबुध्दीतून काँग्रेस नेत्यांवर कारवाई करण्याचा एकछत्री कार्यक्रम भाजपा सरकारने सुरू केला आहे. शासनाच्या या पक्षपाती धोरणाचा निषेध करण्यासाठी गुरूवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसचे आजी-माजी आमदार व कार्यकर्ते एकवटले. जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यातील भाजप सरकारने काँग्रेसच्या कार्यकाळातील अनेक जनहिताच्या योजना बंद करण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये प्रामुख्याने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे उदाहरण देता येईल. आघाडी सरकारने सुरू केलेले आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या अभियानातून अनेक गावांचा कायापालट झाला आहे. मात्र, या लोकल्याणकारी अभियानास भाजप शासनाने गुंडाळण्याचा निर्णय घेतला. अंबानगरीचे आराध्य दैवत कर्मयोगी श्रीसंत गाडगेबाबांंनी निष्काम कर्मयोग व स्वच्छतेचा संदेश दिला. अशा कर्मयोगाच्या नावे सुरू असलेले यशस्वी अभियान गुंडाळण्याची या सरकारची भूमिका अतिशय निंदनीय असल्याच्या भावना काँग्रेसच्या आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या समोर व्यक्त केल्यात.भाजप सरकारने विकासाची कामे न करता काँग्रेस नेत्यांवर सुडभावनेतून कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. हे चूक आहे. लोकसमस्या न सोडविल्यास आता काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल. -यशोमती ठाकूर, आमदार तिवसाकाँग्रेसची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर अन्याय करून त्यांना वेठीस धरण्याचे प्रकार शासनाने थांबवावेत आणि जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे.- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेसभाजप सरकार केवळ सूडाचे राजकारण करीत आहे. याचा मी निषेध करतो, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शासनाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान त्वरीत सुरू करावे,- वीरेंद्र जगतापआमदार, धामणगांव रेल्वेसरकारने दुष्काळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा. काँग्रेस नेत्यांवर केली जाणार कारवाई थांबवावी. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत.- नरेशचंद्र ठाकरे, माजी आमदार मोर्शी