शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

चौदाव्या वित्त आयोगाच्या निधी वितरणाबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2015 00:39 IST

केंद्र सरकारकडून चौदाव्या वित्त आयोगाचा निधी आता थेट ग्रामपंचायतींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

सूचना अप्राप्त : शासन आदेशाची वित्त विभागाला प्रतीक्षाअमरावती : केंद्र सरकारकडून चौदाव्या वित्त आयोगाचा निधी आता थेट ग्रामपंचायतींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी संबंधित निधी जिल्हा परिषदेकडे उपलब्ध झाला असला तरी हा निधी नेमका कसा वितरित करायचा, याबाबत मार्गदर्शक सूचना नसल्याने ग्रामपंचायतींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यासाठी चौदाव्या वित्त आयोगांतर्गत सुमारे २५ कोटी २१ लाखांचा निधी जिल्हा परिषदेकडेच पडून आहे. ग्रामीण विकासासाठी वित्त आयोगाचा निधी उपलब्ध केला जातो. यापूर्वी जिल्हा परिषदेला १० टक्के व पंचायत समितीला १५ टक्के निधी वित्त आयोगातून दिला जात होता. परंतु यावर्षी १४ व्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांऐवजी थेट संबंधित ग्रामपंचायतीला दिला जाणार आहे. त्यामुळे जि.प. व पं.स.च्या अधिकाराला कात्री लावण्यात आली आहे. राज्यात पहिल्या हप्त्यात मिळालेल्या ८११ कोटी ६६ लाखांपैकी अमरावतीला २५ कोटी २१ लाख रूपये मिळाले आहेत. लोकसंख्येनुसार जनरल ‘बेसिक मॅट’ निधी गावाला दिला जाणार आहे. जिल्ह्यात ८४३ ग्रामपंचायतींनी लाभकेंद्र शासनाने आता थेट ग्रामपंचायतींनाच १४ व्या वित्त आयोगाचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील अमरावती, भातकुली, अचलपूर, वरूड, मोर्शी, धारणी, चिखलदरा, दर्यापूर, अजंनगाव सुर्जी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे, चांदूरबाजार आदी तालुक्यांतील ८४३ ग्रामपंचायतींना होणार आहे.