शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायत निवडणुकांविषयी संभ्रम

By admin | Updated: March 31, 2015 00:23 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या २७ मार्च रोजीच्या सुधारीत आदेशानुसार जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायतच्या

अधिसूचनाच नाही : १४ तहसीलदारांवर निलंबन कारवाईचे आयोगाचे आदेशअमरावती: राज्य निवडणूक आयोगाच्या २७ मार्च रोजीच्या सुधारीत आदेशानुसार जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारला १४ तालुक्यात अधिसूचना प्रसिध्द झाली नाही. त्यामूळे मंगळवार ३१ मार्चपासून नामांकन अर्ज देणे व स्वीकारणे ही प्रक्रिया प्रभावित झाली आहे. आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सर्व तहसीलदारांना कर्तव्य पार पाडीत नसल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश प्रधान सचिव व विभागीय आयुक्तांना दिले आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश मूळ निवडणूक कार्यक्रमातील परिच्छेद ९ नुसार आयोगाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत. तहसीलदार कर्तव्य पार पाडीत नसल्याने २ आॅगस्टच्या २००६ परिपत्रकानुसार तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई तत्काळ करुन तसेच अशा तहसीलदारांऐवजी तहसीलदार यांच्यापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या गटविकास अधिकारी तसेच इतर तत्सम अधिकारी त्यांच्याकडे ग्रामपंचायत निवडणूक संदर्भातील दिनांक २७ जानेवारी १९९५ च्या आयोगाच्या आदेशानुसार तहसीलदारांकडे सोपविलेले अधिकार तत्काळ प्रदान करावेत.