शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वृषभच्या उपचारासाठी कबड्डीपटूंचा संघर्षाचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:41 IST

कर्करोगग्रस्त कबड्डीपटू वृषभ बानासुरे याच्या उपचारासाठी गावातील कबड्डी संघांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. नुकत्याच खानापूर येथे झालेल्या कबड्डीच्या सामन्यांमध्ये नांदगाव पेठ येथील संघांनी तीनही बक्षिसे खेचून आणली. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना विजयी तीनही संघांनी सदर रक्कम वृषभच्या उपचारासाठी देण्याचे जाहीर केले. कबड्डीपटूंची मित्रासाठी चाललेली ही धडपड बघून बक्षीस वितरण सामारंभाला लाभलेले जि.प. सदस्य प्रकाश साबळे यांनीदेखील तातडीने पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली.

ठळक मुद्देतीनही पारितोषिकांवर नांदगावच्या मंडळांची बाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव पेठ : कर्करोगग्रस्त कबड्डीपटू वृषभ बानासुरे याच्या उपचारासाठी गावातील कबड्डी संघांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. नुकत्याच खानापूर येथे झालेल्या कबड्डीच्या सामन्यांमध्ये नांदगाव पेठ येथील संघांनी तीनही बक्षिसे खेचून आणली. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना विजयी तीनही संघांनी सदर रक्कम वृषभच्या उपचारासाठी देण्याचे जाहीर केले. कबड्डीपटूंची मित्रासाठी चाललेली ही धडपड बघून बक्षीस वितरण सामारंभाला लाभलेले जि.प. सदस्य प्रकाश साबळे यांनीदेखील तातडीने पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली.वृषभ दादाराव बानासुरे हा २१ वर्षीय कबड्डीपटू तीन आठवड्यांपासून नागपूर येथील रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेत आहे. ऐन उमेदीच्या काळात वृषभवर जीवघेणा प्रसंग ओढवला. नांदगावचे कबड्डीपटू मिळतील त्या ठिकाणी सामन्यातून बक्षीस खेचून आणत ही रक्कम वृषभच्या उपचारावर खर्च करीत आहेत. रविवारी खानापूर येथे वीर भगतसिंग क्रीडा मंडळाच्यावतीने कबड्डीचे सामने घेण्यात आले होते. विदर्भातील २५ संघ सहभागी झाले होते. नांदगाव पेठ येथील सप्तरंग क्रीडा मंडळ, गणेश क्रीडा मंडळ व वीर केसरी क्रीडा मंडळ यांनी दमदार खेळ करून अनुक्रमे तीनही बक्षीस खेचून आणले.तीनही बक्षिसे एकाच गावात गेल्याने उपस्थितांनी मान्यवरांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र, तीनही संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पारितोषिक रक्कम वृषभसाठी देणार असल्याचे जाहीर करताच त्यांना गहिवरून आले. गहिवरून गेले. रात्री ११ वाजता या सामन्यांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश साबळे, पं.स. समिती सदस्य गणेश कडू, युवक काँग्रेस महासचिव किरण महल्ले, वीर भगतसिंग मंडळाचे अध्यक्ष अविनाश पावडे, अमित गावंडे, अक्षय सरोदे उपस्थित होते.सीएम चषकातील बक्षिसाची रक्कम वृषभच्या वडिलांच्या स्वाधीनग्रामपंचायतच्या प्रांगणात पार पडलेल्या सीएम चषक स्पर्धेत कबड्डी संघाला मिळालेल्या तिन्ही क्रमांकांच्या बक्षिसाची रक्कम संघसहकाºयांनी वृषभचे वडील दादाराव बानासुरे यांच्या स्वाधीन केली. सप्तरंग क्रीडा मंडळ, हिंदवी स्वराज्य क्रीडा मंडळ आणि वीर केसरी क्रीडा मंडळ यांच्या खेळाडूंनी वृषभच्या वडिलांची भेट घेऊन अधिकाधिक रक्कम जुळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कबड्डीपटू राहिलेल्या वृषभच्या उपचारासाठी गावातील सर्व नागरिकदेखील मदतीकरिता एकवटले आहेत. पुढेही उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सर्वांनी सांगितले.