शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भक्ती, ज्ञान, कर्मयोगाचा संगम; संत अच्युत महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:41 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगेबाबांच्या जातकुळीशी थेट संबंध राखणाºया संत अच्युत महाराज यांची मंगळवारी पाचवी पुण्यतिथी. ....

ठळक मुद्देपाचवी पुण्यतिथी : शेंदूरजनाबाजार येथे भाविकांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगेबाबांच्या जातकुळीशी थेट संबंध राखणाºया संत अच्युत महाराज यांची मंगळवारी पाचवी पुण्यतिथी. त्यानिमित्त मंगळवारी (१२ सप्टेंबर) शेंदूरजनाबाजार येथे विविध कार्यक्रम होत आहेत. संत अच्युत महाराजांची जातकुळी वैराग्यमूर्ती गाडगेबाबा व राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांच्या जातकुळीशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे भगवी वस्त्रे, गंधमाळ, कर्मकांडाचे षोडषोपचार त्यांना जमलेच नाहीत. त्यांची वाङ्मय निर्मिती प्रचंड आहे. त्यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जोपसली, हृदय रुग्णालय त्याचे द्योतक.राष्ट्रसंतांचे खरेखुरे शिष्योत्तमभागवत, महाभारत, दुर्गा सप्तशती, रामायण, भगवद्गीता अशा संस्कृत भाषेतील कित्येक धार्मिक ग्रंथांचा त्यांनी अनुवाद केला. राष्टÑसंतांच्या विचारांचा प्रचार करण्याच्यादृष्टीने सन १९८४ मध्ये गुरूकुंज आश्रम येथे त्यांनी मानवता प्रतिष्ठानची स्थापना केली. सन १९८५ मध्ये त्यांच्या सत्संग परिवाराकरिता स्थिर पीठ असावे म्हणून भक्तांच्या सहकार्याने श्री. संत अच्युत महाराज संस्थानची स्थापना झाली. शासनाने संस्थानला बाबांच्या हयातीतच तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा दिला आहे.वंचित, दु:खितांसाठी संत अच्युत महाराज अखेरपर्यंत झिजले. संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराजांप्रमाणे त्यांनी त्यांचा कर्मयज्ञ शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवला. यामुळे त्यांचे प्रवचनच नामसंकीर्तन आणि पूजाअर्चा होऊन जात असे. राष्टÑसंतांची पताका खांद्यावर घेऊन वारीला निघालेले संत अच्युत महाराज हे त्यांचे एकमेव शिष्योत्तम होते, असे म्हणता येईल. हृदयरूग्णांच्या सेवेसाठी संत अच्युत महाराजांनी साने गुरूजी मानव सेवासंघाची सन १९८७ मध्ये स्थापना केली. त्यांनी सुरू केलेले हृदयरूग्णांच्या सेवेचे कार्य अखंड सुरू आहे. त्यांच्या प्रेरणेने श्रीसंत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल व रिसर्च सेंटर अमरावतीलाच स्थापन करण्यात आले. अद्ययावत पॅथलॅब, अ‍ॅन्जीओग्राफी, अँजीओप्लास्टी, बायपास, ओपन हार्ट, क्लोज हार्ट सर्जरी, पेसमेकर व लहान मुलांवरील बिनटाक्याची की-होल सर्जरी येथे निष्णात सर्जन व कार्डीओलॉजिस्ट करीत आहेत. या रूग्णालयात सात हजारपेक्षा अधिका सर्जरी यशस्वी होणे, हिच संत अच्युत महाराजांना खरी श्रद्धांजली आहे. श्रीक्षेत्र शेंदूरजनाबाजार येथे त्यांनी सूचविलेल्या पूर्वनियोजित स्थळी महाराजांची भव्य महासमाधी आकारास येत आहे.कुष्ठरुग्णांबद्दल होता अपार जिव्हाळासंत अच्युत महाराजांना कुष्ठरूग्णांबद्दल कमालीचा जिव्हाळा व सहानुभूती होती. त्यातच त्यांचे शिवाजीराव पटवर्धन यांचेशी आपुलकीचे नाते जुळले. शेवटच्या क्षणापर्यंत बाबांनी आपल्या दैनंदिन प्रवचनामधून येणारा पूर्ण आरतीचा पैसे कुष्ठधामातील बालकल्याण निधीत अर्पण केले.कौंडण्यपूर येथे शिवभवनाची स्थापना करून तेथील देवदेवळांचा त्याकाळी जीर्णोद्धार व भक्तांकरिता निवासाची व अन्नदानाची सोय केली. वरूड जवळील राष्टÑसंतांची तपोभूमी नागठाण्याच्यासुद्धा जीर्णोद्धार करून चैतन्यभूमी साकारल्याचे संत अच्युत महाराज संस्थान व हार्ट हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.अनिल सावरकर यांनी सांगितले.