शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेवरील जप्ती टळली, कर्मचाऱ्याला धनादेश

By admin | Updated: February 15, 2017 00:04 IST

कोर्टाच्या आदेशाने महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर आलेली जप्ती मंगळवारी टळली.

३.७२ लाख रुपये देण्याचा निर्णय : विधी अधिकाऱ्यांची समयसूचकताअमरावती : कोर्टाच्या आदेशाने महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर आलेली जप्ती मंगळवारी टळली. संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तातडीने ३.७२ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तो धनादेश बेलिफच्यावतीने दिवाणी न्यायालयात जमा करण्यात आला. तातडीने धनादेश दिल्याने महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावरील जप्तीची कारवाई टळली.तक्रारकर्ते मुकुंद खजिनदार हे मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास दिवाणी न्यायालयाचे बेलिफ विलास काळे यांना घेऊन महापालिका कार्यालयात जप्तीसाठी पोहोचले. तथापि आयुक्त हेमंत पवार कार्यालयात नसल्याने त्यांनी महापालिकेचे विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण यांची त्यांनी भेट घेतली. चव्हाण यांनी हे प्रकरण वरिष्ठांना ऐकवले. त्यानंतर जप्तीची कारवाई टाळण्यासाठी खजिनदार यांना ३ लाख ७२ हजार ३७९ रुपयांच्या व्याजाच्या रकमेचा धनादेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारी ३ च्या सुमारास उपायुक्त प्रशासन यांच्या स्वाक्षरीने खजिनदार यांना मिळालेला धनादेश बेलीफ यांनी स्वीकारला. तो धनादेश स्थानिक दिवाणी न्यायालयात जमा करण्यात येईल. महापालिकेतील बाजार परवाना विभागात लिपिक असलेल्या खजिनदार यांना सन १९८६ मध्ये निलंबित करण्यात आले. निलंबनकाळातच त्यांना सन २०११ मध्ये सेवानिवृत्त केले. मात्र त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेही लाभ देण्यात आले नाही. त्याविरोधात खजिनदार यांनी कामगार न्यायालयात धाव घेतली. त्यात कामगार न्यायालयाने प्रोव्हीजनल पेन्शन देण्याचा आदेश महापालिकेला दिला. मात्र तो आदेश महापालिका यंत्रणेने मानला नाही. त्यामुळे तत्कालीन आयुक्त व उपायुक्तांविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार खजिनदार यांनी केली. न्यायालयाचा वॉरंट निघाल्यानंतर महापालिकने खजिनदार यांना प्रोव्हीजनल पेन्शन म्हणून १६ लाख रुपये दिलेत. व्याजास मनपाचा होकारअमरावती : या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत तब्बल ३ वर्षे गेले. त्यामुळे या रकमेवरील व्याज मिळण्यासाठी त्यांनी पुन्हा दिवाणी न्यायालयात धाव घेतली. त्यावर व्याजाची रक्कम न दिल्याने दिवाणी न्यायालयाने महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाची जप्ती करण्याचे आदेश पारित केले. त्याअनुषंगाने न्यायालयाची नोटीस घेऊन बेलीफ मंगळवारी महापालिकेत पोहोचले. खजिनदार यांच्या न्यायालयीन प्रकरणात मंगळवारी दिवाणी न्यायालयाची जप्ती आली होती. तथापि ३.७२ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आल्याने ती कारवाई टळली.- श्रीकांत चव्हाण, विधी अधिकारी