शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या खुर्चीची जप्ती टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 22:03 IST

अकोली वळणरस्त्याचे भूसंपादनप्रकरणी शेतकऱ्याला १०.१० लाखांचा मोबदला दिला नसल्याने जिल्हा दिवाणी न्यायालयाने स्पेशल बेलीफद्वारे बुधवारी जप्ती वारंट बजावला. महापालिका प्रशासनाने दोन लाखांचा भरणा करून जप्ती टाळली व उर्वरित रकमेकरिता एका महिन्याचा अवधी मागितला.

ठळक मुद्देअकोली वळणरस्ता : दहापैकी दोन लाखांचा भरणा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अकोली वळणरस्त्याचे भूसंपादनप्रकरणी शेतकऱ्याला १०.१० लाखांचा मोबदला दिला नसल्याने जिल्हा दिवाणी न्यायालयाने स्पेशल बेलीफद्वारे बुधवारी जप्ती वारंट बजावला. महापालिका प्रशासनाने दोन लाखांचा भरणा करून जप्ती टाळली व उर्वरित रकमेकरिता एका महिन्याचा अवधी मागितला.अकोली वळणरस्त्याकरिता मौजा नवसारी येथील ईश्वरसिंह रामसिंह पवार यांची ०.३२ हेक्टर आर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. मात्र, २ लाख ६० हजारांचा मोबदला मान्य नसल्याने त्यांनी जिल्हा दिवाणी न्यायालयात दाद मागितली. त्यांना बाजारभावाप्रमाणे १० लाख १० हजार ५२५ रुपये मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. मात्र, महापालिका प्रशासन मुदतीत रकमेचा भरणा न करता टाळाटाळ करत असल्याची बाब पवार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली असता, जिल्हा दिवाणी न्यायालयाद्वारे स्पेशल बेलीफद्वारे जप्ती वारंट बजावला. महापालिका आयुक्त संजय निपाणे व विधी अधिकारी चव्हाण यांनी पवार यांच्याशी चर्चा करून दोन लाखांचा धनादेश दिला व उर्वरित रक्कम एक महिन्यात देण्याचे मान्य केल्याने महापालिकेवरील जप्ती टळली.