वरूड : राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या ठरलेली यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे पाटील यांच्याप्रति सहवेदना व्यक्त करण्याकरिता १९ मार्च रोजी तालुक्यातील विविध संघटनांनी महात्मा ज्योतीराव फुले आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हारार्पण करून अन्नत्याग आंदोलन केले.
गिरीश कराळे, निळकंठ यावलकर, आशिष लोहे, नितीन ठाकरे, उमेश बंड, मनोज भोर, मनोज गेडाम, चंदू अडलक, शरद राऊत, देवेंद्र विधळे, अमोल कोहळे, रामा खोडे, राहुल चौधरी, संजय बहुरूपी, राहुल बरडे, उमेश निंभोरकर, जयंत भोपत यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, समाज प्रबोधन मंच, सत्यशोधक फाउंडेशन, किसानपुत्र आंदोलन, वरूड व्यापारी संघ, रंगरावजी कराळे स्मृती प्रतिष्ठान पोरगव्हाण, वरूड तालुका मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते.