शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा ग्रंथोत्सवाचा थाटात समारोप

By admin | Updated: February 17, 2016 00:05 IST

स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात आयोजित तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला.

पुस्तक परीक्षण : मान्यवरांचे मार्गदर्शनअमरावती : स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात आयोजित तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला. समारोपीय कार्यक्रमाला महापौर चरणजितकौर नंदा, नगरसेवक प्रशांत वानखडे, ग्रंथपाल प्र.म.राठोड, सचिव ग्रंथालय सचिव राम देशपांडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, गोपाल उताणे उपस्थित होते.तीन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये सकाळी ११ वाजता 'सार्वजनिक ग्रंथालयातील पुस्तक परीक्षण' या विषयावर परिसंवाद रंगला. यामध्ये समर्थ कनिष्ठ महाविद्यालय अमरावतीचे राजेंद्र राऊत यांनी 'दारणा' या ऐतिहासिक कादंबरीवर भाष्य केले. देशबंधू सार्वजनिक वाचनालय वरुडचे ग्रंथपाल चंद्रकांत चांगदे यांनी सार्वजनिक ग्रंथालयातील कामाविषयी, पुस्तके हाताळण्याविषयी माहिती दिली. वाचकाला हवे ते पुस्तक देण्यासाठी ग्रंथापालानेदेखील वाचनाद्वारे अद्यावत रहावे, असे त्यांनी सांगितले. या संवादाचे अध्यक्ष दयार्पूरचे प्राध्यापक रमेश देशमुख होते. प्रसिद्ध वऱ्हाडी लेखिका प्रतिभा इंगोले यांनी लेखकाच्या दृष्टीतून पुस्तक परीक्षणाचे महत्त्व सांगितले. माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी ग्रंथालय चळवळीवर प्रकाश टाकला. ग्रंथपालांच्या समस्या व अडचणी यावर जिल्हा ग्रंथालय संघाच्या माध्यमातून संघटित प्रयत्न करू, असे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष प्रदीप चौधरी यांनी सांगितले. या ग्रथालय महोत्सवाचा विद्यार्थी, नागरिक, ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शविली. असे महोत्सव नियमित आयोजित व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा. सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. संवादातील सर्व वक्तक्त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तीन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सवाचा समारोप थाटात संपन्न झाला. (प्रतिनिधी)