शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

महालेखा नियंत्रकांच्या अहवालात विदर्भाच्या निर्मितीला समर्थन

By admin | Updated: August 31, 2014 23:29 IST

राज्यसभेत स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापनेच्या खासगी प्रस्तावावर चर्चेदरम्यान मार्च २००६ मध्ये पंतप्रधानांनीच विदर्भाच्या गंभीर प्रश्नांवर योजना आयोगाची विशेष समिती नियुक्त केली होती.

सुरेश सवळे - चांदूरबाजारराज्यसभेत स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापनेच्या खासगी प्रस्तावावर चर्चेदरम्यान मार्च २००६ मध्ये पंतप्रधानांनीच विदर्भाच्या गंभीर प्रश्नांवर योजना आयोगाची विशेष समिती नियुक्त केली होती. या समितीच्या विशेष अभ्यासगटाने विदर्भाच्या वेगवेगळ्या भागांना भेटी देऊन नागरिक, कार्यकर्ते, राजकीय नेते, मंत्री व शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन महालेखा नियंत्रक व परीक्षकांच्या सहकार्याने २२५ पानांचा अहवाल सादर केला होता. सन २००६-०७ च्या या अहवालात विदर्भावर झालेल्या अन्यायाचे वास्तव असून स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणारा आहे.विदर्भाचा आर्थिक समतोल लक्षात घेता महाराष्ट्रात विदर्भाचा विकास अशक्यप्राय असल्याची बाब अहवालात स्पष्ट करण्यात आली आहे. विदर्भ विकासाकरिता महाराष्ट्र सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचेही सरकारची उदासीनता, विदर्भाचा निधी इतरत्र पळविण्याचे कारस्थान, वीज निर्मिती व वीज वितरणातील प्रचंड भेदभाव याकडेही या अहवालात लक्ष वेधण्यात आले. राज्यपालांनी २००२ ते २००५ दरम्यान मंजूर केलेल्या निधीमधून २५०० कोटी रुपये विदर्भाला कमी देण्यात आले आणि त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राला मंजुरीपेक्षा १६०० कोटी अधिक देण्यात आले. ही योजना आयोगानेच उघड केली आहे.बछवत लवादाप्रमाणे सिंचन प्रकल्पासाठी विदर्भाला निधी देण्यामध्ये राज्य सरकारने कुचराई केली. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी विदर्भाचा पैसाही वळविला. आयोगाने यासंबंधी विचारले असता विदर्भातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे निधी नाही. केंद्राने निधी उपलब्ध करुन द्यावा, असे राज्य शासनाने त्यावेळी म्हटले होते. त्यामुळे विदर्भाचे स्वतंत्र राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात रुपांतर का करण्यात येऊ नये, असा मुद्दा त्यावेळी योजना आयोगाने उपस्थित केला होता.