शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:19 IST

धामणगावातील रस्ते निर्मनुष्य धामणगाव रेल्वे : संचारबंदीत शहरातील रस्ते निर्मनुष्य होते. दरम्यान सोमवारी शंभर जणांची कोरोणा चाचणी करण्यात ...

धामणगावातील रस्ते निर्मनुष्य

धामणगाव रेल्वे : संचारबंदीत शहरातील रस्ते निर्मनुष्य होते. दरम्यान सोमवारी शंभर जणांची कोरोणा चाचणी करण्यात येणार आहे. शास्त्री चौक, सिनेमा चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक, मार्केट चौक या भागात पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. दरम्यान विना माक्स फिरणाºया काही जणांना पोलिसांनी चांगलेच चोपले. मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी, तळेगाव दशासर, देवगाव येथे प्रतिष्ठाने बंद होती. एस टी बंद असल्याने ग्रामीण परिसरातील कोणीही शहराकडे वळले नाही. कोरोना संशयिताचे सर्वेक्षण करण्यात येईल, असे तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी सांगितले.

----------

फोटो पी २१ भातकुली

भातकुलीत कडकडीत बंद, ग्रामिणमध्ये संमिश्र प्रतिसाद!

भातकुली : कोरोना नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी भातकुली शहरातसह तालुक्यातील ग्रामीण भागात बंद पाळण्यात आला. बंदला शहरात उत्स्फूर्त, तर ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानाशिवाय इतर हॉटेल, पानटपरी व विविध प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. तालुक्यातील खोलापूर, वाठोडा शुकलेश्वर, पूर्णानगर आदी ग्रामीण भागात बंद संमिश्र राहिला. मात्र, बंद दरम्यान अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांसह शहरातील दवाखाने, मेडिकल, दूधडेअरी, पेट्रोल पंप, वीज सेवा, पाणीपुरवठा, नाल्या सफाईची कामे सुरू असल्याचे दिसून आले. येथील ठाणेदार विजयकुमार वाकसे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी येथील बसस्थानकावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली.

----------------

फोटो पी २१ चांदूरररेल्वे

चांदृूररेल्वेत कडकडीत बंद

चांदूर रेल्वे : शहरातील बाजारपेठ लॉकडाऊन असल्याने संपूर्णत: बंद होती. पोलिस निरीक्षक मगन मेहते व पालिकेच्या मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनी शहरातून फेरफटका मारला. जिल्ह्यात कोरोना कसा वाढतो आहे, याबाबत माहिती देण्यात आली. मेडिकल वगळता सुरू असलेली प्रतिष्ठाने समज देऊन बंद करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गांसह तालुक्याच्या ग्रामीण भागातही संचारबंदीला व्यापक प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. महसूल, पोलीस व महसूल विभाग रस्त्यावर उतरला होता.

---------------

फोटो पी २१ वरूड

वरूडमध्ये संचारबंदीतही तुरळक वर्दळ

वरूड : कोरोना प्रतिबंधासाठी रविवारी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनला वरूडकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला. प्रवासी वाहतुकीसह अन्य वाहनेदेखील रस्त्यावर नव्हती. मात्र, नागरिकांची तुरळक वर्दळ होती. रस्त्यावर पोलीस व शुकशुकाट असतानाही काही नागरिक रस्त्यावर येत होते. पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाची गस्त सुरू होती. शहर शांत होते. औषधी, दवाखाने वगळता सर्व बंद होते. तहसीलदार किशोर गावंडे, उपमुख्याधिकारी गौरव गाडगे, ठाणेदार प्रदीप चौगावकर रस्त्यावर उतरले होते.

-------------

फोटो पी २१ मोर्शी बंद

मोर्शीत प्रतिष्टाने बंद; पोलीस रस्त्यावर

मोर्शी : कोरोना विषाणूची शनिवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी घोषीत केली असून त्याच अनुषंगाने मोर्शी शहरातसुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आला. केवळ दवाखाने व मेडिकल सेवा वगळता शहरातील इतर सर्व आस्थापना बंद होत्या. जयस्तंभ चौक येथे पोलीस निरीक्षक संजय सोळंके, पीएसआय सचिन भोंडे यांचेसह वाहतूक पोलीस सुभाष वाघमारे व मोहन बारब्दे यांनी विना मास्क, रस्त्यावर अकारण फिरणाºया जवळपास ६० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. संचारबंदी दरम्यान वाहतूक अतिशय तुरळक सुरू होती.

---------------

फोटो पी २१ चिखलदरा

चिखलदरा पर्यटनस्थळ लॉक डाऊन

चिखलदरा : पर्यटन स्थळावर शनिवारी सायंकाळी सात वाजतापासून पर्यटकांसह स्थानिकांचाही प्रवेश बंद करण्यात आला. कुठल्याच प्रकारचे वाहन आतमध्ये सोडण्यात आले नाही. चिखलदरा नगर परिषदेचे कर्मचारी आणि पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता. रस्ते मनुष्यविरहित दिसून आले. पर्यटन स्थळासह व्याघ्र प्रकल्प अंतर्गत जंगल सफारी, हत्ती सफारी, सेमाडोह पर्यटन स्थळावर सुद्धा पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. कोरोना त्रिसूत्रीचे पालन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रस्त्यावर दिसून आली.

----------

फोटो पी २१ परतवाडा बंद

परतवाडा-अचलपूरमध्ये सर्वत्र शुकशुकाट

परतवाडा : वाढती कोरोना संख्या बघता रविवारच्या लॉकडाऊनमध्ये अचलपूर-परतवाडा शहरात सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळाला. नागरिकांनीही या लॉकडाऊनला सहकार्य केले. शनिवारला जाहीर केल्या गेलेल्या कंटेनमेंट झोनमधून रविवारला कुणीही बाहेर पडले नाही. तर बाहेरील व्यक्तीने आत प्रवेश घेतलेला नाही. शहरातील बसस्टँडवर सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. आॅटोरिक्षाची वाहतुकही बंद होती. शनिवार सायंकाळी ८ वाजतापासूनच दोन्ही शहरात पोलीस तैनात होते. परतवाडा शहरातील बाजारपेठ, मुख्य रस्ते, अचलपूर, अमरावती, अकोला-अंजनगाव मार्ग, अचलपूर शहरातील देवडी, चावलमंडी, सराफा लाईनसह सर्वच परिसर ओस पडला होता. मानवविरहीत वर्दळमुक्त शहर यात अनुभवाला आले.

—————————————

फोटो पी २१ दर्यापूर

दर्यापुरात कडेकोट बंद

दर्यापूर : संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. प्रशासनामार्फत शनिवारीच नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले. अकारण बाहेर पडलेल्या काही वाहनचालकांना दंडुक्याचा प्रसाद देण्यात आला. चारचाकी व दुचाकींवर प्रशासनामार्फत संयुक्त कारवाई करत १६ हजार ५०० रुपये दंड वसुल करण्यात आला. शहरासह तालुक्यात सुद्धा पोलिसांचा ताफा सकाळपासूनच तैनात होता. यावेळी तहसीलदार योगेश देशमुख, ठाणेदार प्रमेश आत्राम, एपीआय सचीन जाधव, नगर पालिकेचे राहुल देशमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते.

-------

चांदूर बाजार तालुका स्वयंस्फूर्तीने बंद

चांदूर बाजार : कोरोनाचे रुग्ण पाहता जिल्हा प्रशासनाने ३६ तासांचे लॉकडाऊन घोषित केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठ शनिवारी सायंकाळी ८ वाजतापासून स्वयंस्फुर्तीने बंद ठेवली. रविवारी सकाळी पालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र जाधव व पथक बाजारपेठेमध्ये फेरफटका मारून तळ ठोकून होते. बस बंद असल्याने ग्रामिण भागातील संपूर्ण वाहतूक बंद होती. तर शहरातील बाजारपेठ बंद असताना काही नागरिक अकारण बाजारपेठेमध्ये गर्दी करीत होते. आमच्यासोबत पोलीस असते, तर नियमभंग करणाºयांविरूद्ध गुन्हे दाखल करता आले असते, असे पालिका पथकाने म्हटले.

---------------

धारणी शहरात कडेकोट बंद

धारणी : रविवार सकाळपासून पोलिसांचे पथक गस्तीवर होते. परिणामी अकारण फिरणारे दिसून आले नाही. शहरातील वनविभाग तपासणी नाक्यापासून जयस्तंभ चौक, होली चौक, चर्च रोड, हनुमान चौक, दयाराम चौक, पेट्रोल पंप, बसस्थानक आणि मधवानाल्यापर्यंत मुख्य मार्ग निर्मनुष्य आढळून आला. सगळीकडे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे हवसे दिसून आले नाही. ठाणेदार विलास कुलकर्णी आपले संपूर्ण चमूसह सकाळपासून रस्त्यावर उतरले होते. केवळ दवाखाने आणि मेडिकल दुकान उघडे होते.

---------------

नांदगावमध्ये संमिश्र प्रतिसाद

नांदगाव खंडेश्वर : शनिवार रात्रीपासून आरंभलेल्या लॉकडाऊनला शहरासह तालुक्यात व्यापक प्रतिसाद मिळाला. सर्व प्रतिष्ठाने बंद होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. पोलिसांची उपस्थिती तेवढी दिसत होती. एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील लोक शहरात आले नाहीत. मास्क न वापरणाऱ्यांकडून महसूल, पोलीस व नगरपंचायतीने दंड वसूल केला.

-----------------