शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदाचे रखडलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:59 IST

पाचही जिल्ह्यांमध्ये जे प्र्रकल्प रखडले आहेत व ज्या प्रकल्पांवर निधी मंजूर आहे, त्या प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी केल्या.

ठळक मुद्देअविनाश सुर्वे : आढावा बैठकीला विभागातील अभियंत्यांची उपस्थिती

अमरावती : पाचही जिल्ह्यांमध्ये जे प्र्रकल्प रखडले आहेत व ज्या प्रकल्पांवर निधी मंजूर आहे, त्या प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी केल्या.अविनाश सुर्वे यांनी गुरुवारी येथील दोन्ही मुख्य अभियंता कार्यालयाच्या सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक घेऊन वेगवेगळ्या बाबींवर आढावा घेतला. विभागातील पाचही जिल्ह्यांतील निर्माणाधीन व निधीअभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचा आढावा त्यांनी घेतला. प्रकल्पाच्यावतीने अनुशेष निर्मूलन कार्यक्रम अपूर्ण प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. निर्माणाधीन व रखडलेल्या प्रकल्पांचे भूसंपादन, पुनर्वसन, पर्यावरण विभागाची मान्यता तसेच येऊ घातलेल्या बजेटमध्ये प्रस्तावित करण्यात येणाºया विविध प्रकल्पांची सुधारित प्रशासकीय मान्यता, बळीराजा जलसंजीवनी योेजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या विभागातील ६८ प्रकल्पांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर, अमरावतीचे अधीक्षक अभियंता रमेश ढवळे, विशेष प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र जलतारे यांच्यासह पाचही जिल्ह्यांतील अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांसह महत्त्वाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. अंदाजे सात ते आठ तास चाललेल्या या आढावा बैठकीत पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी ज्या प्रकल्पांना अडचण निर्माण झाल्या, त्यावरही मुख्य अभियंत्याशी कार्यकारी संचालकांनी चर्चा केली. निर्माणाधीन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला कार्यकारी संचालक अमरावती येथील मुख्यालयी शिबीर आयोजित करतील, असा निर्णयही या बैठकीत झाल्याची माहिती आहे.