शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
3
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
4
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
5
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
6
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
7
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
8
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
9
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
10
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
11
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
12
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
13
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
14
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
15
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
16
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
17
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
18
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
19
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
20
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 

विद्यापीठाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करेन

By admin | Updated: November 25, 2015 00:49 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शासन दरबारी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन,

रणजित पाटील : पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा शुभारंभअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शासन दरबारी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, असे आश्वासन राज्याचे गृह, शहरी विकास, सामान्य प्रशासन, विधी व न्याय आणि सांसदीय कार्य राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांनी केले. विद्यापीठातील पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठ परिसरातील अ‍ॅथेलेटीक ट्रॅकजवळ हा कार्यक्रम सोमवारी पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू मोहन खेडकर, महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत देशपांडे, प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, कुलसचिव अजय देशमुख, बीसीयुडी संचालक आर.एस. सपकाळ, परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते, वित्त व लेखाधिकारी शशिकांत आस्वले, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर व कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे उपस्थित होते. रणजित पाटील पुढे म्हणाले, यावर्षी पाण्याची समस्या बिकट आहे. त्यामुळे पाणी वापराचे नियोजन सर्वांना करावयाचे आहे. विद्यापीठाने २०-२५ वर्षांचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून जलकुंभ निर्मितीचे कार्य हाती घेतले, ही बाब अभिनंदनीय आहे. विद्यापीठात संत गाडगेबाबांच्या नावाने अध्यासनाची परिपूर्ण इमारत बांधण्याकरिता ५.५० कोटी रूपयांची आवश्यकता आहे. गाडगेबाबा आमचे दैवत आहेत. त्यासाठी निधी देण्याचा प्रयत्न करू, उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे हा मुद्दा लावून धरू, असे आश्वासन त्यांनी दिले. श्रीकांत देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.चार लक्ष लीटर क्षमता असलेली पाण्याच्या टाकीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. प्रास्ताविक भाषणातून कुलसचिव अजय देशमुख यांनी कार्यक्रमा विषयी माहिती दिली. संचालन जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यार्थी कल्याण संचालक गणेश मालटे यांनी केले. कार्यक्रमाला दिनेश सूर्यवंशी, एम.टी. देशमुख, डी.जी. भंडागे, अमरसिंह राठोड, रवी वैद्य, अधिष्ठाता मार्कस लाकडे, विद्यापीठाचे विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)