शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

जुनी कामे पूर्ण करा, नव्यांना हातही लावू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:38 IST

अधीक्षक अभियंता एस.एस. चारथळ यांनी अमृत योजनेच्या कामांची पाहणी केली असता सहकंत्राटदाराने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याची कानउघाडणी केली. 'जुनी कामे पूर्ण करा, नव्यांना हातही लावू नका', असे ठणकावले.

ठळक मुद्देनिकृष्ट कामे : अधीक्षक अभियंत्यांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

संदीप मानकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : अधीक्षक अभियंता एस.एस. चारथळ यांनी अमृत योजनेच्या कामांची पाहणी केली असता सहकंत्राटदाराने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याची कानउघाडणी केली. 'जुनी कामे पूर्ण करा, नव्यांना हातही लावू नका', असे ठणकावले.अमृत पाणीपुरवठा योजनेची कामे निकृष्ट व मंदगतीने होत आहे. नियोजनाअभावी कामे रखडली असून यासंदर्भात 'लोकमत'ने हा मुद्दा लोकदरबारात मांडताच मजीप्राच्या अधीक्षक अभियंत्यांनी गाडगेनगर, राधानगर व विनायकनगरमधील कामांची पाहणी केली. सबकॉन्ट्रक्टर दीपक पाटील यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याची चांगलीच कानउघडणी करण्यात आली.अमृत योजना ही ११४ कोटींची आहे. पण शहरात अनेक प्रभागांत नवीन पाईपलाईन व इतर कामांसाठी ८३ कोटींचा करारनामा आहे. सदर कंत्राट हा नाशिक येथील पी.एल. आडके यांना मिळाल्याची माहिती मजीप्रा अभियंत्यांनी दिली. ज्या ठिकाणी खोदकाम केले व पाईपही टाकले त्याठिकाणी अर्ध्या रस्त्यांपर्यंत माती तशीच ठेवली आहे. या ठिकाणी लेबर कमी व सुपरवायझरच जास्त दिसत असल्याने कामांवर जबाबदार सुपरवायझर ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. अर्धवट कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, उपअभियंता म्हसकरे, शाखा अभियंता शेंडे, मनपाचे उपअभियंता प्रमोद इंगोले, शाखा अभियंता राजेश आगरकर, मॅनेजर माणिकपुरे तसेच नगरसेवक चंदू बोंबरे उपस्थित होते.कंत्राटदाराला एक कोटी २७ लाखांचा दंडकामे ही वेळीत पूर्ण होत नसल्याने व हलगर्जीपणा होत असल्याने आतापर्यंत कंत्राटदारांच्या देयकातून १ कोटी २७ लक्ष रूपये दंड शुल्क वसूल केल्याची माहिती अधीक्षक अभियंता चारथड यांनी दिली. जेव्हापासून कामे मंदगतीने होत आहे. कंत्राटदाराला प्रतिदिन ८९ हजार २६४ रूपये दंड आकारण्यात येत आहे. ११४ कोटींची अमृत योजना असून ८३ कोटींचा पाईपलाईन व इतर कामांचा करारनामा झाला आहे. यामध्ये ५० टक्के निधी हा केंद्र शासनाचा २५ टक्के निधी हा राज्य शासन व २५ टक्के निधी हा मनपाचा या योजनेवर खर्च करण्यात येणार आहे.लोकांनी जावे कसे?विनायकनगरातील काळे नामक नागरिकांच्या घराजवळ नवीन पाईपलाईन टाकल्यानंतर एक खड्डा बुजविण्यात आला नव्हता. त्यामुळे लोकांना घरात जातानाही अडचण निर्माण झाली होती. कामांच्या पाहणीदरम्यान ही बाब अधीक्षक अभियंत्यांच्या लक्षात येताच लोकांनी जावे कसे, असा सवाल त्यांनी उपअभियंता व शाखा अभियंत्यांना केला व त्वरित हा खड्डा कंत्राटदारांकडू न बुजवून घ्यावा, कामात हलगर्जीपणा होता कामा नये.कामांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. कंत्राटदाराला नोटीसही देण्यात येईल. कामे करताना लोकांना त्रास होऊ नये, याची जबाबदारी घ्यावी.- एस. एस. चारथळ, अधीक्षक अभियंता जीवन प्राधिकरणजे रस्ते खोदले व पेव्हिंग ब्लॉक काढले ते कामे तातडीने पूर्ण करून घेऊ. यानंतर सतत या कामांवर आमचे लक्ष राहणार आहे.- प्रमोद इंगोले,उपअभियंता महापालिका