शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट नियोजित वेळेत पूर्ण करा

By admin | Updated: May 30, 2016 00:41 IST

पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दीर्घ आयुष्यी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे.

पालकमंत्री : जिल्हा, तालुकास्तरीय विविध योजनांचा आढावाअमरावती : पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दीर्घ आयुष्यी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. यामुळेच जमिनीची धूप कमी होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी स्थिर राहील. पयार्याने पाणीटंचाईवर मात करता येईल. जिल्ह्यात यावर्षी दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करून अधिकाधिक वृक्षांची निर्धारित वेळेत लागवड करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जलयुक्त शिवार, महात्मा गांधी रोजगार हमी योजनांतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय विविध योजनांचा पालकमंत्र्यांनी शनिवारी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी किरण गीत्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) काळे, तहसीलदार सुरेश बगळे, कृषी, जलसंपदा व जलसंधारण, विद्युत, आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर वृक्ष लागवड कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी १ जुलैपासून ठरविले आहे. कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात पाच गावांची निवड करून किमान ५० शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करावे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये ७० गावांची निवड झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड नसेल त्यांना जॉब कार्ड पुरवून शेतात वृक्षांची लागवड व संगोपनासाठी प्रवृत्त करावे. यासाठी कमीत कमी पाच फुटांचे रोप किंवा कलम शेतकऱ्यांना सामाजिक वनीकरण विभागाने उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.यासाठी कामे प्राधान्याने पूर्ण करून निधी उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यात ४०० पांदण रस्ते लोकसहभागातून तयार झाली आहेत. अपूर्ण रस्ते पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करावीत. खरीप पिकांच्या लागवडीकरिता उत्कृष्ट दर्जाचे बियाणे व खत पुरवठा शेतकऱ्यांना करावा. यासाठी कृषी विभागाने महाबीज व इतर प्रणालींना शेतकऱ्यांची मागणी कळवून पूर्तता करावी. विभागात सुमारे साडेपाचशे कोटी पीककर्ज वितरणाची शासकीय कार्यवाही पूर्ण झाली आहे.बैठकीत पांदण रस्ते, धडक सिंचन विहीर व नरेगा विहीर, कृषी पंप विद्युत जोडणी, बियाणे, जलयुक्त शिवार अभियान व इतर आवास योजना या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा यावेळी झाली. बैठकीला महसूल, कृषी, पशुसंवर्धन, जलसंपदा व जलसंधारण, जि.प. विद्युतचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)