शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

कोठूनही करता येणार तक्रार; मग घरातूनच करा ई-एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 12:46 IST

जर्मनी मध्ये नोकरीची संधी शेकडो तक्रारी दाखल : सिटिझन पोर्टलमुळे घरबसल्या सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविण्याची प्रतिक्रिया अतिशय किचकट आहे. अनेक जण येथे जाण्याचे टाळतात. त्यासाठी काही लोकं गंभीर प्रकार झाला, तरी तक्रार नोंदवत नव्हते. आता हा त्रास कमी झाला आहे. आता घरबसल्या ई- तक्रार दाखल करता येते. याची पोलिसांना दखल घ्यावी लागते.

कोठूनही कोणत्याही पोलिस ठाण्यात, अशी तक्रार देण्याची सुविधा सिटीझन पोर्टल व अमरावती ग्रामीण व शहर पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शहर पोलिसांनी दुचाकी चोरी, मोबाइल चोरीबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ई-तक्रारींची पोलिसांकडून दखल घेतली जाते. त्या पोलिस ठाण्याच्या लॉगइनवर ती तक्रार वरिष्ठांनाही दिसते. त्यामुळे तक्रारींवर कारवाई करावीच लागते.

काय आहे ई- एफआयआर ? सिटिझन पोर्टलवर आपले अकाउंट तयार करावे. लॉगइन आयडी, पासवर्ड दिल्यानंतर हे अकाउंट तयार होते. यावरून तक्रार करता येते. तो एफआयआर पोलिसांना दिसतो.

तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सोपी तक्रार दाखल झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संबंधित ठाण्यात उपस्थित राहावे लागते. ई- तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे.

तक्रार कशी नोंदवाल? सीसीटीएनएस प्रणालीअंतर्गत अनेक सुविधा नागरिकांनाही मिळत आहेत. याअंतर्गतच ई-एफआयआर दाखल केला जातो. त्यासाठी सिटिझन पोर्टलचा वापर करावा लागतो.

तक्रारीसाठी काय आवश्यक? ई-एफआयआर दाखल करण्यासाठी सिटीझन पोर्टलवर अकाउंट क्रिएट करणे आवश्यक आहे. त्यानंतरच तक्रार देता येते. त्यासाठी अधिकृत मोबाइल क्रमांक जोडावा लागतो.

नागरिकांच्या सुविधेसाठी सेवा ई-तक्रार ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा अधिकाधिक वापर करणे अपेक्षित आहे. यामुळे वेळेची बचत होणार आहे व प्रक्रियेला गती येईल.

पोलिस खात्री करणार सिटीझन पोर्टलवरून आलेल्या तक्रारींची पोलिसांकडून खात्री केली जाते. यासाठी तक्रारदाराने परिपूर्ण माहिती भरूनच तक्रार करणे अपेक्षित आहे. खरी माहिती भरणे अनिवार्य आहे.

पोलिस अधिकारी काय म्हणाले? "ई-एफआयआर ही पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. याचा अर्थ ती ऑनलाइन दाखल करता येते. याच्या मदतीने कोणताही नागरिक ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे कुठूनही पोलिसांकडे तक्रार करू शकतो. पोलिस सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी बनवणे हा ई-एफआयआरचा मुख्य उद्देश आहे." - किरण वानखडे, प्रमुख, स्थानिक गुन्हे शाखा 

टॅग्स :Amravatiअमरावती