फिर्यादही स्वहस्ताक्षरात : डीजीचे आदेशअमरावती : बलात्कार, विनयभंग आणि दंगा यासारखे गुन्हे नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. या गुन्ह्याबाबत फिर्यादीच्या हस्ताक्षरात पोलिसांना फिर्याद नोेंदवून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर डायरीमध्ये गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. त्याचबरोबर फिर्यादी अर्थात तक्रारकर्त्याचे व्हिडीओ शूटिंगही घ्यावे लागणार आहे, अशा सूचना पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गुन्हे सिध्दीचे प्रमाण वाढविण्यासाठी कोर्ट मॉनिटरिंग सेल कार्यान्वित झालेला असताना या नव्या सूचनेच्या अंमलबजावणीनंतर आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले, असा पोलीस प्रशासनाचा कयास आहे.बलात्कार, विनयभंग व दंगे यासारखे गुन्हे पोलीस स्टेशनलला दाखल होतात. परंतु त्यानंतर हे गुन्हे परस्पर तडजोडीने मिटविले जातात. त्यानंतर कोर्टात आरोपपत्र दाखल होऊन आरोपीची निर्दोष सुटका होते. त्यामुळे पोलीस विभागाचा वेळही वाया जातो. त्यामुळे गंभीर गुन्ह्याची फिर्याद घेण्याबाबत पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. त्यानुसार पीडित व्यक्ती ठाण्यात आल्यानंतर त्याला त्याच्या हस्ताक्षरात फिर्याद लिहून द्यावी लागणार आहे. त्यानंतर तो गुन्हा डायरीत नोंदविला जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तक्रारकर्त्यांचे होणार व्हिडिओ शूटिंग
By admin | Updated: November 16, 2015 00:21 IST