शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण सहायक संचालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार, नियमबाह्य घरभाडे वसुलीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 20:43 IST

शासनाच्या विविध विश्रामगृहात वास्तव करून ते फसवणूक करीत असल्याची तक्रार सोमवारी गाडगेनगर पोलिसात प्राचार्य आर.डी.सिकची यांनी दिली आहे. सहसंचालक विरूद्ध प्राचार्य फोरम हा वाद आता शिगेला पोहचला आहे. 

अमरावती : येथील उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे हे १० महिन्यांपासून घरभाडे भत्त्याची उचल करीत आहे. दुसरीकडे शासनाच्या विविध विश्रामगृहात वास्तव करून ते फसवणूक करीत असल्याची तक्रार सोमवारी गाडगेनगर पोलिसात प्राचार्य आर.डी.सिकची यांनी दिली आहे. सहसंचालक विरूद्ध प्राचार्य फोरम हा वाद आता शिगेला पोहचला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील केळकर वाडीस्थित रहिवासी आर.डी. सिकची यांनी सोमवारी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, अशोक कळंबे यांनी १४ एप्रिल २०१८ रोजी उच्च शिक्षण सहसंचालक पदाचा कारभार स्वीकारला. रूजू झाल्यापासून कळंबे हे शासनाच्या विविध विश्रामगृहात अनधिकृतपणे आणि विनाशुल्क वास्तव करीत आहे. असे असताना ते तब्बल १० महिन्यांपासून शासनाकडून घरभाडे भत्तासुद्धा घेत आहेत. एकीकडे घरभाडे भत्ता घेणे आणि दुसरीकडे गाडगेनगर स्थित शासकीय तंत्र शिक्षण महाविद्यालय व अमरावती विद्यापीठाच्या विश्रामगृहात विनाशुल्क मुक्काम ठोकणे हा सर्व प्रकार नियमबाह्य असल्याचे प्राचार्य सिकची यांनी तक्रारीत नमूद केले आहे. शासनाकडून घरभाडे भत्ता घेऊन दुसरीकडे शासकीय जागेत विनाशुल्क राहणे ही बाब शासनाची शुद्ध फसवणूक आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाºयांवर भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करून शासनाची होणारी फसवणूक थांबवावी, अशी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. गाडगेनगर पोलीस कारवाई करणार काय, याकडे शिक्षण क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत. 

सहविचारी सभेनंतर कळंबे यांच्याविरुद्ध रोष वाढलायेथील उच्च व तंत्र शिक्षण संचालकांच्या पुढाकाराने २ मार्च रोजी अमरावती विभागातील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांची सहविचारी सभा घेण्यात आली. या सभेत सहसंचालक अशोक कळंबे यांच्या कारभारावर बोट ठेवत त्यांना 'टार्गेट' करण्यात आले. कर्मचाºयांच्या सेवापुस्तिका गहाळ होण्याबाबत कळंबे यांच्यावर रोष व्यक्त करण्यात आला.

होस्टेलच्या नियमानुसार विश्रामगृहात वास्तव्य आहे. शुल्क अदा केल्याच्या पावत्यादेखील माझ्याकडे आहे. मी काहीही नियमबाह्य केले नाही. सिकची यांचे आरोप वैयक्तिक कामे पूर्ण करण्यासाठीची धडपड आहे. मात्र, मी कोणतेही नियमबाह्य कामे करणार नाही अथवा करू देणार नाही.- अशोक कळंबे,   सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती