शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रकरणाची तक्रार गृहराज्यमंत्र्यांकडे

By admin | Updated: August 25, 2016 00:10 IST

काली- पिवळीच्या चालकाला बेदम मारहाण करणे दर्यापूर वाहतूक पोलिसांना चांगलेच महागात पडणार आहे.

वाहन चालकाला मारहाण प्रकरण : चौकशीचा अहवाल केव्हा ?अमरावती: काली- पिवळीच्या चालकाला बेदम मारहाण करणे दर्यापूर वाहतूक पोलिसांना चांगलेच महागात पडणार आहे. या प्रकरणाची तक्रार फिर्यादीने वकीलामार्फत गृहराज्यमंत्री रणजित पाटील व जिल्हा पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांच्याकडे तक्रार केली आहे.प्रकरणातील काली- पिवळीच्या वाहन चालक संतोष टोळे याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी त्याला डिस्चार्ज मिळाला.मागील आठवडयात गुरुवारी दर्यापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत तीन वाहतूक पोलिसांनी येथीलच काली- पिवळीच्या चालकाला पैसे न दिल्यामुळे बेदम मारहाण केली होतीे. या प्रकारानंतर निराशा येवून वाहन चालक संतोष टोळे याने विष प्राशन केले होते. त्याला तातडीने सामान्य रुग्णांलयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती स्थिर असल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, मारहाण करणारे पोलीस अद्यापही मोकाटच आहेत. अंजनगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवतारे यांना जिल्हा पोलीस अधिक्षकांनी चौकशीचे आदेश देवून कारवाईचा अहवाल मागितला मात्र अद्याप हा अहवाल सादर झाला नसल्याचे माहिती याप्रकरणी वाहतूक पोलिसांना वाचविण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप केल्या जात आहे. काली- पिवळीचा चालका दारु पिऊन होता. त्यानेच आपणास अश्लील शिवीगाळ केली असे येथील वाहतूक पोलिसांनी आपल्या बयाणात नोंदविले आहे. चालकाचा दोष नसतांना व प्रकरणी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली नसताना वाहतूक पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. निरपराध वाहन चालकाला बेदम मारहाण करणाऱ्या 'त्या' वाहतूक पोलिसांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी वाहन चालक संतोष टोळे याच्या परिवाराने केली आहे. मात्र, तक्रारीवर दर्यापूर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप टोळे परिवाराने केला आहे. (प्रतिनिधी)