शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ धान्यमालकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:42 IST

येथील पोलिसांनी १४ जानेवारी रात्री ९ वाजता १६ टन तांदूळ भरलेला ट्रक पकडला होता. अखेर १० दिवसांनी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने धान्यमालकावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत ई.सी. अ‍ॅक्ट ३, ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ठळक मुद्देतांदूळ जप्ती प्रकरण : महसूल विभागाने आठ दिवसांनी सोपविला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : येथील पोलिसांनी १४ जानेवारी रात्री ९ वाजता १६ टन तांदूळ भरलेला ट्रक पकडला होता. अखेर १० दिवसांनी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने धान्यमालकावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत ई.सी. अ‍ॅक्ट ३, ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.रेशनच्या साठ्यातील हा तांदूळ असावा, असा संशय पोलिसांना होता. परंतु, त्यासाठी गुन्हा दाखल करताना महसूल विभागाचा अहवालाची आवश्यकता होती. या प्रकरणात महसूल विभागाकडून अहवालास विलंब झाल्याने गुन्हा दाखल नव्हता. ट्रक पकडल्यानंतर आठ दिवसांनी चौकशी अधिकारी भगत यांनी तहसीलदारामार्फत पोलीस विभागाला अहवाल सोपविला. ‘सदर तांदूळ रेशनचे असल्याचे दिसते; मात्र निश्चित सांगता येत नसल्याने पोलिसांनी त्यांच्या स्तरावर कार्यवाही करावी’ असे अहवालात नमूद आहे. पोलिसांनी जीवनावश्यक कायदा व सार्वजनिक साठवणूक व विक्री कायद्यांतर्गंत कलम ३ व ७ नुसार धान्यमालक बंडू अग्रवाल, ट्रकचालक मो.मिया बशीर मियाविरुद्ध गुन्हा नोंदवि आला. सदर १६ टन मालाची किंमत १८ लाख ५२ हजार इतकी दाखविण्यात आली आहे.बाजार समितीची ना!धान्यमालकाने अचलपूर बाजार समितीच्या आवारामधून तांदूळ खरेदी केल्याचे सांगितले होते. त्याने याबाबत कागदपत्रेही पोलिसांकडे सादर केली. तथापि, अचलपूर बाजार समितीच्या आवारात तांदूळ व साखर खरेदी-विक्री करण्यास बंदी असल्याचे संबंधित अधिकाºयांनी सांगितले. ट्रक सेस भरलेला नाही; अर्थात बाजार समितीच्या आवारातून हा माल गेलाच नाही, अशी माहितीही संबंधितांकडून पोलिसांना देण्यात आली.